
ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) सिडनी (Sydney) येथे २३ वर्षीय ऋषभ पंतने (Rishabh Pant) ९७ धावांची खेळी केली आणि भारताला सामना अनिर्णित करण्यास मदत केली, तर ब्रिस्बेनच्या नाबाद ८९ धावांच्या खेळीमुळे भारताने ऐतिहासिक मालिका विजय नोंदविला होता.
ऑस्ट्रेलियामध्ये भारताच्या ऐतिहासिक विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार्या विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतची सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या महिन्यातील सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूच्या पहिल्या पुरस्कारासाठी निवड झाली. ICC ने पहिल्यांदाच महिन्याच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार सुरू केला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे २३ वर्षीय पंतने ९७ धावांची खेळी केली आणि भारताला सामना अनिर्णित करण्यास मदत केली, तर ब्रिस्बेनच्या नाबाद ८९ धावांच्या खेळीमुळे भारताला ऐतिहासिक मालिका जिंकता आली. पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त करताना पंतने ICC कडून प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “संघाच्या विजयात कोणत्याही खेळाडूसाठी योगदान देणे हे सर्वात मोठे पुरस्कार आहे, परंतु अशा उपक्रमामुळे युवकांना स्वत: ला सुधारण्यासाठी प्रेरणा मिळेल.”
तो म्हणाला, ‘हा पुरस्कार मी टीम इंडियाच्या (Team India) प्रत्येक सदस्याला अर्पण करतो ज्याने ऑस्ट्रेलियामध्ये आमच्या विजयात योगदान दिले. मला मतदान करणाऱ्या सर्व चाहत्यांचे मी आभार मानू इच्छितो.” पंतने इंग्लंडविरुद्ध चेन्नई येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या तिसर्या दिवशी ९१ धावांची आक्रमक खेळी खेळली होती.
पंतच्या हा पुरस्कार जिंकल्याबद्दल ICC व्होटिंग एकॅडमीचे सदस्य आणि पाकिस्तानचे माजी कर्णधार रमीज राजा म्हणाले, ‘पंतने दडपणाखाली हे दोन डाव खेळले आणि विविध आव्हानांना सामोर गेला. त्याने सामने ड्रॉ करणे आणि सामने जिंकण्याचे कौशल्य दाखवले. यावेळी त्याने एक आश्चर्यकारक मानसिकता दर्शविली.’
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला