“हा” माजी विकेट कीपर म्हणाला- भारतासाठी १०० कसोटी सामने खेळण्याची क्षमता आहे ऋषभ पंतकडे

Rishabh Pant has the ability to play 100 Tests for India, said the former wicketkeeper

पंतने भारतासाठी १८ पैकी १४ कसोटी सामने खेळले आहे, तर चार कसोटी सामने भारतात खेळले आहे. मोरे म्हणाले, ‘पंतने काही चांगले झेल घेतले आणि उत्तम स्टंपिंगही केली. जरी त्याने काही संधी गमावल्या, परंतु तो केवळ २३ वर्षांचा आहे आणि त्याला सुधारण्याची गरज आहे, जेणेकरून तो जगातील सर्वोत्तम यष्टीरक्षक बनू शकेल.’

भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज किरण मोरेने (Kiran More)युवा यष्टीरक्षक ऋषभ पंतची (Rishabh Pant)स्तुती केली आहे आणि असे म्हटले आहे की तो १०० कसोटी सामने खेळणारा क्रिकेटपटू आहे. इंग्लंड विरुद्ध चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यात ऋषभ पंतने विकेटच्या मागे चांगली कामगिरी केली. पहिल्या डावात त्याने नाबाद ५८ धावाही केल्या.

ऋषभ पंत जेव्हा वयाच्या १७ व्या वर्षी २१ सप्टेंबर २०१४ रोजी दिल्लीकडून खेळला तेव्हा बडोदा क्रिकेट असोसिएशन विरुद्धच्या अंडर -१९ अखिल भारतीय वन डे आमंत्रण स्पर्धेत त्याने १३३ चेंडूत आठ षटकार आणि २२ चौकारांसह १८६ धावा केले होते तेव्हा मोरे या खेळीमुळे प्रभावित झाले आणि त्याने पंतचे नाव त्याच्या मोबाइलवर नोंदवले होते.

किरण मोरे म्हणाला, ‘जेव्हा केव्हा मी एक प्रतिभावान मुलगा पाहतो तेव्हा माझी सवय आहे की मी त्याचा नंबर लक्षात ठेवतो. पंतला पाहिल्यावर मी स्वतःला सांगितले की हा लंबी रेस का घोड़ा आहे. आता मी म्हणतो की पंत १०० कसोटी सामने खेळणारा क्रिकेटपटू आहे. फक्त यासाठी नाही कि त्याने मंगळवारी विकेटच्या मागे उत्तम कामगिरी केली.’

काही तज्ज्ञांनी पंतच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह लावले असता, मोरे म्हणाले की पंतच्या कौशल्य आणि क्षमतेबद्दल त्यांना कधीही शंका नव्हती. बेंगळुरूच्या नॅशनल क्रिकेट एकॅडमीमध्ये पंतबरोबर काम करणारे मोरे म्हणाले, “प्रत्येकाने त्याच्या विकेटकीपिंगवर प्रश्नचिन्ह ठेवले, परंतु मला यात कधीच शंका नव्हती. जेव्हा तुम्ही त्याला भारतात खेळण्याची संधी दिली नाही, तेव्हा तो कसा शिकेल. भारतात खेळण्यापेक्षा परदेशात खेळणे अधिक कठीण आहे. टर्निंग पिचवर विकेटकीपरची जबाबदारी महत्त्वाची असते. पंत काय करू शकतो हे प्रत्येकाने पाहिले आहे.”

पंतने परदेशात भारतासाठी १८ पैकी १४ कसोटी सामने खेळले आहेत, तर चार कसोटी सामने भारतात खेळले आहेत. मोरे म्हणाले, ‘पंतने काही चांगले झेल घेतले आणि उत्तम स्टम्पिंगही केली. जरी त्याने काही संधी गमावल्या, परंतु तो अवघ्या २३ वर्षांचा आहे आणि त्याला सुधारण्याची गरज आहे, जेणेकरून तो जगातील सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक बनू शकेल.’ पंतने १८ कसोटी सामन्यांमध्ये ४४.८५ च्या सरासरीने १२५६ धावा केल्या आहेत. कसोटीत त्याने दोन शतके आणि सहा अर्धशतके ठोकली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER