रिषभ पंतने मोडला धोनीचा विक्रम

Rishabh Pant Faster than Dhoni

ऑस्ट्रेलियात सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या रिषभ पंत (Rishabh Pant). याने आपण चांगले यष्टीरक्षक- फलंदाज असल्याचे सिध्द केले आहे. भारतातर्फे तो सर्वात जलद एक हजार धावा करणारा यष्टीरक्षक ठरला आहे. ब्रिस्बेन (Brisbane) कसोटीतील दुसऱ्या डावात त्याने हा टप्पा गाठला आहे.

फलंदाजीत ही उपयुक्तता सिध्द करण्याआधी त्याने भारतातर्फे सर्वात जलद 50 गडीसुध्दा टिपले आहेत. यष्टीरक्षक म्हणून त्याची ही कामगिरी 11 कसोटी व 22 डावांतील होती तर फलंदाज म्हणून एक हजार धावांचा टप्पा त्याने 16 कसोटी आणि 27 डावात साधला आहे. विशेष म्हणजे या एक हजारपैकी त्याच्या 699 धावा ह्या ऑस्ट्रेलिया व इंग्लंडमधील आहेत. यावरुन फलंदाज म्हणून त्याची उपयुक्तता सिध्द होते.

धावांच्या बाबतीत तो धोनीपेक्षा (MS Dhoni) जलद ठरला आहे. धोनीने 32 डावात एक हजार धावांचा टप्पा पूर्ण केल्या आहेत.

आता भारतीय यष्टीरक्षकांमध्ये धोनी व पंतशिवाय फारुक इंजिनियर, वृध्दिमान साहा, नयन मोंगिया, सैयद किरमाणी व किरण मोरे यांनी हजार धावा पूर्ण केलेल्या आहेत.

भारतीय यष्टीरक्षकांनी हजार धावांचा गाठलेला टप्पा

रिषभ पंत- 27 डाव
महेंद्रसिंग धोनी- 32 डाव
फारुक इंजिनियर- 36 डाव
वृध्दिमान साहा- 37 डाव
नयन मोंगिया- 39 डाव
सैयद किरमाणी- 45 डाव
किरण मोरे- 50 डाव

जागतिक पातळीवर यष्टीरक्षकांमध्ये हजार धावा पूर्ण करण्यात दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डीकॉक सर्वात जलद आहे. त्याने 21 डावात हा टप्पा गाठला होता.

यष्टीरक्षकांच्या सर्वात जलद 1 हजार धावा
क्वींटन डीकॉक (दक्षिण आफ्रिका) – 21 डाव
दिनेश चांदीमल (श्रीलंका) – 22 डाव
जाॕनी बेयरस्टो (इंग्लंड)- 22 डाव
कुमार संघकारा ( श्रीलंका)- 23 डाव
एबी डिविलीयर्स (दक्षिण आफ्रिका)- 23 डाव

ब्रिस्बेन कसोटी सुरु होण्याआधी रिषभ 976 धावांवर होता. पहिल्या डावात 23 धावा केल्यावर तो 999 धावांवर होता आणि आज मंगळवारी पहिली धाव घेताच त्याने हजार धावा पूर्ण केल्या.

ही बातमी पण वाचा : India vs Australia 4th Test: रोहित शर्माने स्टीव्ह स्मिथचे केली कॉपी, चाहत्यांनीही लुटला आनंद; पहा व्हायरल व्हिडिओ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER