IND vs AUS Sydney Test : ऋषभ पंतने सोडले २ कॅच, सोशल मीडियावर फुटला चाहत्यांचा राग

Rishabh Pant

सिडनी क्रिकेट मैदानावर तिसर्‍या कसोटीच्या पहिल्या दिवशी ऋषभ पंतने दोन झेल सोडल्यानंतर सोशल मीडियावर क्रिकेट चाहत्यांनी भारतीय यष्टिरक्षकाची थट्टा करायला सुरुवात केली.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सिडनी क्रिकेट मैदानावर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या तिसऱ्या सामन्यात भारतीय यष्टीरक्षक ऋषभ पंतची खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाली.

२ वेळा विलला जीवनदान
ऋषभ पंतणे स्टंपच्या मागे २ वेळा ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर विल पुकोव्स्कीचा झेल सोडला. त्यावेळी हा फलंदाज २६ आणि ३२ च्या वैयक्तिक स्कोअरवर फलंदाजी करीत होते. याचा फटका टीम इंडियाला सहन करावा लागला.

पंतची पहिली चूक
सिडनी कसोटी सामन्यात १३ षटकानंतर गोलंदाजीवर आलेल्या रविचंद्रन अश्विनने संघाला लवकरच यश मिळवून दिले असते. त्याच्या गुडलेंथ चेंडूने पुकोव्स्कीच्या बॅटची धार घेत विकेटच्या मागे गेला परंतु ऋषभ पंतने साधा झेल सोडला.

पंतची दुसरी चूक
यानंतर थोड्या वेळाने मोहम्मद सिराजचा शॉर्ट पिच बॉल पुकोव्स्कीने हवेत उडी मारून पूल मारून खेचण्याच्या प्रयत्न केला पण पंत यावेळीही झेल टिपण्यास अपयशी ठरला. तथापि, मागील कॅचच्या तुलनेत हा झेल थोडा अवघड होता.

पुकोव्स्कीची पन्नास
विल पुकोव्स्कीने पदार्पण सामन्यात अर्धशतक झळकावत भारतीय यष्टीरक्षक ऋषभ पंतकडून २ जिवनदानाचा फायदा उठविला. मात्र ६२ धावा करून तो नवदीप सैनीचा बळी ठरला. विशेष म्हणजे ही सैनी आणि पुकोव्स्की या दोन्ही खेळाडूंची पदार्पण कसोटी आहे.

२ कॅच सोडल्यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांनी ऋषभ पंतला ट्रोल करण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर पंतच्या खराब फील्डिंगमुळे लोक खूप रागावले. चला अशी काही ट्वीट पाहूया.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER