रिंकू म्हणतेय स्टाइल मे रहेने का

Rinku Rajguru

तिचे कुरळे केस एकदम स्ट्रेट झालेत. सेंटरपीन लावून सैलवेणीच्या जागी लेअरकट आलाय. टिपिकल ग्लॉसी लाल लिपस्टीक मागे पडून आता मॅटफिनिश कॉफी ब्राऊन तिला खुलून दिसायला लागलाय. सैलसर चुडीदार नव्हे तर ए लाइन फिटिंग लाँगलेंथ किंवा शॉर्ट कुर्तीपासून जॉर्जेटसाडीच्या नजाकतीने तिचा लूकच चेंज केलाय. हे सगळं कुणाविषयी बोललं जातंय याची उत्सुकता वाटणं स्वाभाविक आहे. ही आहे पडद्यावरची आर्ची अर्थात रिंकू राजगुरू (Rinku Rajguru). सैराट सिनेमाने रातोरात स्टार झालेल्या रिंकूच्या मेकओव्हरने तिचे चाहते तर खुश झाले आहेतच पण मला स्टायलीश रहायला आवडतं असं म्हणत रिंकूनेही स्वतामध्ये केलेल्या या बदलाचे कौतुक केले आहे.

Kept refusing offers as people wanted me to do another 'Sairat': Rinku Rajguru - The Northern Heraldसातवीत असताना रिंकू वडिलांसोबत एका सिनेमाच्या सेटवर गेली आणि तिथे तिला दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी पाहिलं. त्यांच्या डोक्यात तेव्हा सैराट सिनेमाची कथा घोळत होती आणि त्यातील आर्चीच्या गावरान लूकसाठी रिंकूचा चेहरा आवडला. पुढे सैराट (Sairat) पडद्यावर आला आणि त्यानंतर रिंकूचे आयुष्यच बदलून गेले. सैराट प्रदर्शित झाला तेव्हा रिंकू अवघी १५ वर्षाची होती. आर्चीचं ग्लॅमर अनुभवतच रिंकूने दहावीची परीक्षा दिली. सैराटमध्ये दिसलेली साधी रिंकू आणि आज तिच्या सोशल मीडिया (Social Media) पेजवर झळकणारी रिंकू यांच्यामध्ये जमीन आस्मानचा फरक आहे कारण तिने फिटनेस आणि लूक यासाठी बरीच मेहनत घेतली आहे.

सगळ्यात आधी तर रिंकूने स्लीमट्रीम होण्यासाठी घाम गाळला आणि त्यानंतर चापूनचोपून बांधलेल्या केसांचा स्टायलीश Rinku Rajguru : MarathiTarakaकट केला. ध्यानीमनी नसताना अभिनयाची संधी मिळाली आणि रिंकूचा पहिलाच सिनेमा हिट ठरल्याने तिला खूप ऑफर्स येऊ लागल्या. कार्यक्रमासाठी खास पाहुणी म्हणून निमंत्रणं यायला सुरूवात झाली. रिंकू सांगते, सैराटच्या यशासाठी मला खूप चांगल्या प्रतिक्रिया आल्या तसे माझ्या साधेपणाचं कधी कौतुक झालं तर कधी आता जरा ग्लॅमरस रहा असा सल्लाही मिळाला. पण ग्लॅमरस रहायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे समजत नव्हतं. त्यावेळी माझ्या काही मैत्रीणी तसेच सिनेमा इंडस्ट्रीतील माझ्या हितचिंतकांनी मला स्टाइलचे धडे दिले. मला नृत्याची आवड असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी डान्सची खूप मदत झाली. वजन घटवणारे डान्स करण्यावर भर दिला. सैराटनंतर रिंकूमध्ये झालेल्या बदलामध्ये तिच्यातील आत्मविश्वास वाढला.

स्टायलीश राहण्यासाठी रिंकूने काही मेकअप टिप्स शिकून घेतल्या. त्यानंतर तिने तिच्या केसांवर जास्त लक्ष दिलं. ड्रेसिंगसेन्स बदलला. कोणत्या कार्यक्रमासाठी जाताना काय ड्रेसिंग असावं याचा अभ्यास केला. रिंकूचं बालपण,  शिक्षण सोलापूरमधील एका छोट्या गावात झाल्यामुळे तिच्या     भाषेवर बोलीभाषेचा जास्त प्रभाव होता. अर्थात तिला तिच्या भाषेचा अभिमान आहेच पण एखाद्या कार्यक्रमात संवाद साधण्यासाठी, मुलाखत देताना भाषा चांगली असावी यासाठी रिंकूने खूप मेहनत घेतली. स्टाइल म्हणजे फक्त दिसण्याचा मेकओव्हर नव्हे तर विचार, मतं यातूनही आपण कसे ठसले जाऊ यासाठी रिंकू आग्रही होती. गेल्या वर्षभरात रिंकू राजगुरूने तिच्या इंन्स्टा, फेसबुकवर पोस्ट केलेले फोटो पाहिले तर तिच्या स्टाइलने कमाल केलीय.

Pin on ddpसैराटनंतर प्रकाशझोतात आलेल्या रिंकूने शुभंकर तावडे याच्यासोबत कागर या सिनेमात स्क्रिन शेअर केली. राजकीय घडामोडींवर बेतलेल्या या सिनेमातील रिंकू आणि सैराटमधील रिंकू यांच्यातही खूप चांगला फरक होता. सध्याच्या वेबसिरीज या नव्या माध्यमातही रिंकूने हंड्रेड या वेबमालिकेतून हिंदीमध्ये काम करत एकेक पायरी वर चढत असल्याचे दाखवून दिले. कुणाला गाणं म्हणायला आवडतं, कुणाला भटकायला आवडतं तसं रिंकूला सतत नव्या स्टाइल करून पाहणं आणि फोटो काढून पोस्ट करायला रिंकूला खूप आवडतं.

शाळेत खूप हुशार असलेल्या रिंकूला डॉक्टर व्हायचं होतं. पण सातवीत असताना सैराट सिनेमाची ऑफर, त्यानंतर या सिनेमाचं चित्रीकरण आणि दहावीची परीक्षा देईपर्यंत सैराट प्रदर्शित होऊन रिंकूच्या नावामागे अभिनेत्री हे बिरूद लागणं हे सगळच तिच्यासाठी स्वप्नवत होतं. पहिल्याच सिनेमासाठी अभिनयातील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि आता तिने याच क्षेत्रात करिअर करण्याचा चंग बांधला आहे.

ही बातमी पण वाचा : बॉलिवुडवर राज्य करणाऱ्या मराठी नायिका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER