‘लोकांना मूर्ख बनवण्यासाठी रिकामटेकडा संज्या रोज सकाळी ब्रश न करता टीव्हीवर येतो’

Nilesh Rane - Sanjay Raut

मुंबई :- महाराष्ट्रात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. एकीकडे कोरोनाचे रूग्ण वाढत असताना मृत्यू संख्येचा आलेखही चढतच चालला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे. रुग्णाना रूग्णालयात बेड्स, औषधी, रेमडीसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन मिळत नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. मात्र असे असतानाही शिवसेनेचे खासदार संजय राऊत दररोज माध्यमांशी बोलताना सरकारचे गोडवे गायतांना दिसत आहे. महाराष्ट्राचे रोल मॉडेल देशात लागू करावे असा सल्लाही ते देत आहे. आणि यावरून भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी संजय राऊतांचा(Sanjay Raut) समाचार घेतला आहे. ‘लोकांना मूर्ख बनवण्यासाठी रिकामटेकडा संज्या (Rikamatekada Sanjaya) ब्रश न करता रोज सकाळी टीव्हीवर येतो’, असे ट्विट निलेश राणे (Nilesh rane) यांनी केले आहे.

मदत नाही, नियोजन नाही, आरोग्य सेवा नाही फक्त लॉकडाऊन घ्या आणि घरी बसा. आम्ही फक्त केंद्र सरकारवर टीका करणार आणि महाराष्ट्रातील जनतेला मूर्ख बनवणार. आमच्याकडे एक रिकामटेकडा संज्या आहे रोज सकाळी न ब्रश करता टीव्हीवर येतो, मेलात तरी चालेल कारण तुम्ही मेलात तर तुमची जबादारी, असा उपरोधिक टोला निलेश राणे यांनी राऊतांवर लगावला आहे.

ही बातमी पण वाचा : ‘आता तरी केंद्राने महाराष्ट्राच्या रोल मॉडेलची दखल घ्यावी’, संजय राऊतांचा सल्ला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button