धनंजय मुंडेंवरील आरोपांचा शरद पवारांना गांभीर्याने विचार करावा लागेल : प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar

मुंबई : सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. वेगवेगळे राजकीय पक्षाचे नेते यावर भाष्य करत आहेत. त्यात आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीदेखील त्यांचं मत व्यक्त केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला इभ्रत राखायची असेल तर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा राजीनामा घेतल्याशिवाय पर्याय नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

पुण्यात प्रकाश आंबेडकर यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्वतः धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी केलेल्या बलात्कारसंबंधी आरोपावर प्रतिक्रिया देताना हा गंभीर स्वरूपाचा आरोप असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. त्यामुळे आता यावर मुंडे यांनी हे प्रकरण गांभीर्याने घ्यायचे आहे की नाही ते ठरवायला हवे. मात्र आज ना उद्या केलेला गुन्हा हा बाहेर येतच असतो, असे आंबेडकर म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER