‘मनसे नेत्याची हत्या करणारा जितेंद्र आव्हाडांचा राईट हँड’, निलेश राणेंचा थेट आरोप

Maharashtra Today

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या(MNS) राबोडी प्रभाग अध्यक्ष आणि माहिती अधिकार कार्यकर्ते जमील शेख हत्येप्रकरणी उत्तर प्रदेश एसटीएफने शनिवारी मोठी कामगिरी केली आहे. एसटीएफने मनसे नेते जमील शेख यांच्या हत्येप्रकरणी लखनऊ मधून गोरखपूरमधील रहिवासी असलेल्या इरफान सोनू शेख मंसूरी उर्फ राजधनिया याआरोपीला अटक केली आहे. जवळपास पाच महिने तो फरार होता. विभूती खंड पोलिस स्टेशन परिसरातील कठौता तलावाजवळ एसटीएफने इरफानला पकडले. जमील शेख यांच्या हत्येसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका नेत्याने दहा लाख रुपयांची सुपारी दिल्याचे इरफानने एसटीएफला सांगितले आहे. परंतु सदर राष्ट्रवादीचा नेता हा महाराष्ट्र सरकारमधील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड( Jitendra Awhad) यांचा निकटवर्तीय असल्याची टीका भाजपचे नेते निलेश राणे(Nilesh Rane) यांनी केली आहे.

‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्याची ची गोळी झाडून हत्या केली होती. आरोपी पकडला गेला व त्याने नाव घेतलं नजीबुल्लाहचं. राष्ट्रवादीचा नगरसेवक नजिबुल्लाह हा मंत्री आव्हाडांचा राईट हँड समजला जातो व राष्ट्रवादीचा पदवीधर उमेदवार पण होता. नजीबुल्लाह ठाण्याच्या गोल्डन गॅंगचा फंटर.’ अशा आशयाचे ट्विट करत निलेश राणे यांनी जितेंद्र आव्हाडांना लक्ष्य केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button