रिकी पॉन्टिंग म्हणाला, ‘ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी रविचंद्रन अश्विनला हलक्यात घेतले’

Ravichandran Ashwin - Ricky Ponting

रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) पहिल्या डावात १८ षटकांत ५५ धावा देऊन ४ बळी मिळवत टीम इंडियाला (Team India) ५३ धावांची आघाडी मिळवून दिली. दुसर्‍या डावात स्टंपपर्यंत भारताने एका विकेट गमावून ९ धावा केल्या आहेत आणि त्यांची एकूण आघाडी ६२ धावांवर पोहचली आहे.

माजी क्रिकेटपटू रिकी पॉन्टिंगने (Ricky Ponting) सांगितले की, ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी अनुभवी भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला कमी लेखले आणि या गोलंदाजाविरूद्धच्या त्याच्या आक्रमक वृत्तीने पहिल्या डावात संघाची फलंदाजी धुवून काढली.

या ३४ वर्षीय गोलंदाजाने आपली क्षमता दाखवत ४ गडी बाद केले, ज्यात ज्येष्ठ स्टीव्ह स्मिथला पवेलियनचा रस्ता दाखविण्याचाही समावेश होता. या डे-नाईट टेस्टच्या दुसर्‍या दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ १९१ धावांवर बाद झाला.

रिकी पॉन्टिंग म्हणाला, अश्विनविरूद्ध आमचे फलंदाज जास्त आक्रमक दिसत होते. त्यांनी अश्विनला कमी लेखले पण अश्विनने दाखवून दिले की तो किती महान आहे.’

अश्विनबरोबर इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये दिल्ली कॅपिटलचा प्रशिक्षक म्हणून काम करणारा माजी दिग्गज फलंदाज म्हणाला, “‘ते रविचंद्रन अश्विनविरुद्ध धावा करण्याचा प्रयत्न करीत होते पण इथे सगळं उलट झालं.”

रविचंद्रन अश्विनने पहिल्या डावात १८ षटकांत ५५ धावा देऊन ४ बळी मिळवत टीम इंडियाला ५३ धावांची आघाडी मिळवून दिली. दुसर्‍या डावात स्टंपपर्यंत भारताने एका विकेट गमावून ९ धावा केल्या आहेत आणि त्यांची एकूण आघाडी ६२ धावांवर पोहचली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER