रिक्षा आणि दुचाकी चोरीला

Rickshaw and bike stolen

ठाणे :  ठाणे नगर आणि नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक रिक्षा आणि दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आल्या असून पुढील तपास सुरु आहे. रेल्वे स्टेशन परिसरात पार्क करुन ठेवलेली रिक्षा रविवारी रात्री 8.3क् वाजताच्या सुमारास अज्ञात चोराने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ठाणो नगर पोलीस ठाण्यात आप्पा झोंडे यांनी तक्रार दाखल केली आहे. तर दुस:या घटनेत तीन हात नाका येथील साईबाबा मंदिराच्या बाजूला पार्क मृणाल बारे (20) यांनी आपली दुचाकी पार्क करुन ठेवली होती. सांयकाळी 7 त्या सुमारास त्यांची दुचाकी अज्ञात चोराने चोरुन नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.