बेकहॅम ते मेस्सी : फूटबॉलपटूंच्या कमाईचा दशकाचा प्रवास

Lionel Messi - David Beckham

फूटबॉलमध्ये (Football) सर्वाधिक कमाईत (Earning) सलग तिसऱ्या वर्षी लियोनेल मेस्सीने (Lionel Messi) त्याचा नेहमीचा प्रतिस्पर्धी ख्रिस्तियानो रोनाल्डोला (Christiano Ronaldo) मागे टाकले आहे. 2017 पासून रोनाल्डो कमाईच्या बाबतीत मेस्सीच्या पुढे जाऊ शकलेला नाही.

विश्वविख्यात अर्थविषयक नियतकालिक ‘फोर्बस्’नुसार (Forbes) गेल्या वर्षभरात मेस्सीची कमाई 12 कोटी 60 लाख डॉलर आहे तर रोनाल्डोची कमाई 11 कोटी 70 लाख डॉलर आहे.

10 वर्षांपूर्वी या यादीवर मेस्सीप्रमाणेच इंग्लंडच्या डेव्हिड बेकहॅमचे (David Beckham) राज्य होते. त्यावेळी त्याची कमाई 4 कोटी डॉलरच्या घरात असायची. आता मेस्सी व रोनाल्डोसारखे सुपरस्टार त्याच्या तिप्पट कमाई करत आहेत.

मेस्सीची कारकिर्द सध्या काहीशी अस्थिर आहे. एकतर त्याचा क्लब बार्सिलोना यंदा काहीच यश मिळवू शकलेला नाही आणि दुसरे म्हणजे स्वतः मेस्सीसुध्दा बार्सिलोनासोबत खूश नाही. हा क्लब सोडून जाण्याच्या तो तयारीत होता पण क्लबसोबतच्या करारातील अटी-शर्थी व ट्रान्सफर फीच्या भल्या मोठ्या रकमेने त्याला बार्सिलोनाकडेच रोखून धरले. जर मेस्सी दुसऱ्या क्लबकडे जाऊ शकला असता तर कदाचित त्याने कमाईचा असा विक्रम केला असता जो भविष्यात कुणालाही मोडणे फार अवघड गेले असते. मात्र अजुनही सध्या जगात सर्वाधिक कमाई करणारा स्वीस टेनिसपटू रॉजर फेडररच्या 21 कोटी 26 लाख डॉलरच्या तुलनेत मेस्सी बराच मागे आहे.

धनवान फूटबॉलपटूंच्या यादीत मेस्सी, रोनाल्डो, नेमार हे क्रमाने सलग चार वर्षांपासुन तिसऱ्या स्थानी कायम आहेत. सर्वाधिक प्रगती केलीय ती कायालियन एमबाप्पे याने. गेल्यावर्षीच्या 3 कोटी 60 लाख डॉलरची त्याची कमाई वर्षभरात 4 कोटी 20 लाख डॉलरवर पोहोचली आहे. त्यामुळे तो सातव्या स्थानाहुन चौथ्या स्थानी आला आहे.

पहिल्या 10 मध्ये मोहम्मद सलाह, रॉबर्ट लेवांडोस्की व डेव्हिड डी जिया यांनी प्रवेश केला आहे तर अॕलेक्सीस सांचेझ, मेसुत ओझील, आॕस्कर व आंद्रियास इनियेस्टा हे बाहेर पडले आहेत. पॉल पोग्बा चौथ्या स्थानाहून 16 व्या स्थानी घसरला आहे तर डेव्हिड डी जिया हा टॉप 10 मध्ये आलेला पहिला गोलकीपर आहे. वेन रुनी, जेम्स रॉड्रीगेज, इब्राहामोवीच हे मागे पडले आहेत.

2015 च्या यादीत रियाल माद्रिदचे रोनाल्डो, गॅरेथ बेल व जेम्स रॉड्रीगेज हे टॉप 10 मध्ये होते. आता रियालचा गॅरेथ बेल हा एकटाच टॉप 10 मध्ये आहे. 2015 व 16 मध्ये झाल्टन इब्राहिमोवीच रोनाल्डो, मेस्सीनंतर तिसऱ्या स्थानी होता. पण 2017 मध्ये तो पॕरिस सेंट जर्मेनकडून मँचेस्टर युनायटेडकडे आला आणि नेमार व बेल हे दोघे कमाईत त्याच्या पुढे सरकले. वेन रुनी टॉप थ्रीमध्ये कधीच नसला तर 2011 मध्ये तो सातव्या स्थानी होता. त्यावेळी त्याची कमाई दोन कोटी डॉलर होती. 2012 मध्ये 2 कोटी 40 लाख डॉलरच्या कमाईसह तो चौथ्या स्थानी होता आणि 2018 पर्यंत तो टॉप-10 मध्ये कायम होता.

2010 मध्ये बेकहॅम 4 कोटी डॉलरच्या कमाईसह पहिल्या स्थानी होता. बेकहॅम 2010, 11, 12 आणि 2013 मध्ये तो निवृत्त झाला तोवर कमाईत पहिल्या स्थानी होता. 2010 मध्ये मेस्सी सहाव्या स्थानी होता. त्याच्या पुढल्या वर्षी तो तिसऱ्या स्थानी पोहोचला. पण 2010 मधील आणि आताची तुलना केली तर दहा वर्षांपूर्वीची रक्कम आताच्या तुलनेत क्षुल्लक वाटावी एवढी कमी होती. आणि रोनाल्डोचे वैशिष्ट्य हे की, तो कधीही दुसऱ्या स्थानाच्या घरी घसरलेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER