कर्नाटकातील तांदूळ महाराष्ट्रात काळ्या बाजारात

Anna Bhagya Yojana Scheme - Rice

बेळगाव : कर्नाटकच्या (Karnataka) अन्न भाग्य योजनेतील तांदळाची (Rice) चक्क महाराष्ट्रातील काळ्या बाजारात विक्री होत असल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी अंतर राज्य रॅकेट कार्यरत असल्याचा अंदाज असून आहार व नागरी पुरवठा विभागाचा कारभारही संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पाचजणांना अटक करण्यात आली आहे.

हुबळी येथून अन्न भाग्य योजनेचा दोन ट्रक तांदूळ विनापरवाना महाराष्ट्राला घेऊन जाताना नांदेड पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या तांदळाची किंमत 12 लाख 12 हजार रुपये होते. अन्न भाग्य योजनेच्या रेशन वितरणातील पोत्यांमध्ये हा तांदूळ आढळून आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाचजणांना ताब्यात घेऊन चौकशी केली आहे.

दोन ट्रकमधून हुबळीहून बिडी मार्गे महाराष्ट्राला अन्न भाग्य तांदळाची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची माहिती नांदेड पोलिसांना मिळाली. स्थानकाच्या व्याप्तीतील गोलिहळ्ळी गावानजीक सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER