रियाचा भाऊ शोविक आणि सॅम्युअल मिरांडाला सात दिवसांची एनसीबी (NCB) कोठडी

Shovik and Samuel Miranda .jpg

मुंबई : बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरणाला नवीन वळण आले आहे . अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा (Rhea Chakraborty) भाऊ शोविक आणि सॅम्युअल मिरांडा या दोघांना काल अंमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अटक केली. त्यांना आज कोर्टासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना सात दिवसांची कोठडी सुनावली आहे .

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक आणि सॅम्युअल मिरांडा या दोघांना अंमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) शुक्रवारी रात्री अटक केली.

अंमली पदार्थ प्रतिबंध कायदा कलम 20 ( ब ), कलम 28, कलम 29 आणि कलम 27 ( अ ) या कलमांतर्गत शौविकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर सुशांतसिंह राजपूतचा मॅनेजर सॅम्युल मिरांडा याला देखील अटक करण्यात आली आहे. बसित, जैद, शौविक आणि सॅम्युल मिरांडा यांची समोरासमोर बसून चौकशी करण्यात आली. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे शौविक याच्या सांगण्यावरून बसितनं जैदकडून अंमली पदार्थ आणले होते. जैदकडून शोविकनं अंमली पदार्थ खरेदी केले.

शौविक अंमली पदार्थ घेवून सॅम्युलकडे गेला आणि शौविकच्या सांगण्यावरून अंमली पदार्थांचे पैसे दिले आणि शौविकच्या सांगण्यावरून तसेच त्याच्याकडून घेतलेले अंमली पदार्थ मी म्हणजे सॅम्युलने सुशांतसिंह राजपूतला दिल्याची कबुली या सर्वांनी दिली आहे. त्यामुळे एनसीबीने शौविक आणि सॅम्युल मिरांडा यांना अटक केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER