रिया अटकेसाठी तयार; रियाच्या वकिलाने दिली माहिती

Satish Maneshinde-Rhea

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्स प्रकरणात एनसीबी आज रिया चक्रवर्ती (riya chakraborty) हिची चौकशी करेल. आज सकाळीच एनसीबीने (NCB) तिला समन्स बजावला. रिया एनसीबीच्या कार्यालयात हजर झाली आहे. चौकशीनंतर रिया चक्रवर्ती हिला अटक होण्याची शक्यता वर्तवली जात असताना रिया अटकेसाठी तयार असल्याचे तिचे वकील अ‌ॅड. सतीश मानेशिंदे यांनी म्हटले आहे.

आज (रविवारी) सकाळी रियाच्या घरी एनसीबीचे अधिकारी मुंबई पोलिसांसह दाखल झाले होते. यावेळी एनसीबीनं तिला समन्स बजावलं आणि स्वतःहून चौकशीसाठी येण्याचा किंवा आता पोलिसांसोबत येण्याचा पर्याय तिच्यासमोर ठेवला. त्यानंतर रियाने स्वतःहून चौकशीसाठी हजर राहण्याचे एनसीबीच्या अधिकाऱ्यांना सांगितले. या पार्श्वभूमीवर रियाच्या वकिलांनी ही माहिती दिली. दरम्यान, रिया एनसीबीच्या कार्यालयात हजर झाली आहे.

त्यानंतर तिचे वकील अ‌ॅड. मानेशिंदे म्हणाले की, जर हे प्रकरण जादूटोण्याचं असेल तर रिया चक्रवर्ती अटकेसाठी तयार आहे. प्रेम करणं हा गुन्हा असेल तर ती याचे सर्व परिणाम भोगायला तयार आहे. बिहार पोलिसांनी सीबीआय, ईडी आणि एनसीबीच्या मदतीने दाखल केलेल्या खोट्या केसेसविरोधात निरपराध असल्यानेच रियाने कुठल्याही कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केलेला नाही.

ही बातमी पण वाचा : रिया चक्रवर्तीला आज एनसीबीकडून अटक होण्याची शक्यता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER