रिया चक्रवर्तीची कोठडी ६ ऑक्टोबरपर्यंत वाढली 

Rhea Chakraborty

मुंबई : सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्युप्रकरणात अमलीपदार्थांच्या संबंधात एनसीबीच्या ( नार्कोटिक्‍स कंट्रोल ब्‍यूरो ) जाळ्यात अडकलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिच्या कोठडीत न्यायालयाने ६ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे.

रिया आणि तिचा भाऊ शोविक यांची न्यायालयीन कोठडी आज संपणार होती. रिया आणि शोविकने जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. यावर २३ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे, अशी माहिती रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी दिली.

सुशांत सिंह राजपूतशी संबंधित ‘ड्रग्ज’ प्रकरणाचा तपास एनसीबी (NCB) करते आहे. या प्रकरणात एनसीबीने आतापर्यंत शोविक आणि रियासोबत अनेकांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या ड्रग पेडलर्सच्या चौकशीत सारा अली खान (Sara Ali Khan) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांचीही नावे उघड झाली आहेत. एनसीबी चौकशीसाठी श्रद्धा आणि साराला बोलावण्याची शक्यता आहे. आज किंवा उद्याच सारा-श्रद्धाची चौकशी होऊ शकते. सुशांतने या दोन्ही अभिनेत्रींसोबत काम केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER