रियाचा जामीन अर्ज फेटाळला; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Rhea Chakraborty

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणाला आता नवे वळण आले आहे . सुशांतची कथित गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) अटक झाली असून तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र रियाच्या वकीलांनी रियाला जामीन देण्याची मागणी केली होती, न्यायालयाने ती फेटाळली आहे.

रियाने चौकशीत सर्वांना सहकार्य केले असून याप्रकरणी एनसीबीने (NCB) रिमांड मागितलेले नाही. एनसीबीने तिची चौकशी पूर्ण केली आहे त्यामुळे तिला जामीन मिळाला पाहिजे, असे रियाचे वकील मानेशिंदे यांनी म्हटलं होतं, मात्र कोर्टाने रियाचा जामीन फेटाळला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER