ड्रग्जप्रकरणात रियाने घेतली २५ सेलिब्रिटींची नावे; सारा, रकुलप्रीतसह NCB चौकशीच्या रडावर

Rhea Chakraborty-Sara Ali Khan-Rakulpreet Singh

मुंबई : सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणातून (Sushant Singh Rajput suicide case) समोर आलेल्या ड्रग्सप्रकरणात रिया आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीसह सहा लोकांना अटक केली आहे. रिया चक्रवर्तीने (Rhea Chakraborty) चौकशीदरम्यान बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींची नावे घेतली आहेत.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार एनसीबीच्या रडारवर आता अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan), रकुलप्रीत सिंह (Rakulpreet Singh) आणि फॅशन डिझायनर सिमोन खंबाटा (Simon Khambata) ही नावे आहेत. रिया चक्रवर्तीने तपासामध्ये बॉलिवूडमधील काही नव्या कलाकारांसह एकूण २५ जणांची नावे घेतली आहेत.

ज्यांना चौकशीसाठी एनसीबी बोलवण्याच्या तयारीत आहे. हे सेलिब्रिटी ड्रग्ज घेत असल्याची माहिती रियाने NCB ला दिली आहे. याच माहितीच्या आधारे आज एनसीबी मुंबई-गोव्यामध्ये छापे टाकत आहे. तर शौविकने ड्रग्जसाठी रिया कधी कधी आपल्या अकाउंटमधून पैसे देत असल्याची कबुली दिली तर सॅम्युअलनेसुद्धा या माहितीला दुजोरा देत रियाच्या नावाचा स्पष्ट उल्लेख केला आहे. सॅम्युअल आणि शौविक दोघांनीही रिया ही सुशांतसाठी ड्रग्ज मागवत असल्याची कबुली दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER