रिया चक्रवर्तीला आज एनसीबीकडून अटक होण्याची शक्यता

rhea chakraborty-NCB

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणात ड्रग्ज कनेक्शनबाबत एनसीबीने (NCB) हालचाली सुरु केल्या आहेत. सुशांत सिंह राजपूत केसमध्ये ड्रग्ज कनेक्शनमध्ये शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा एनसीबीच्या रिमांडमध्ये आहेत. यातच एनसीबीच्या टीमनं आज सकाळी रियाच्या घरी जाऊन रिया (Rhea) समन्स दिला आहे. एनसीबीच्या टीमसोबत महिला पोलिस अधिकारी देखील होत्या. रिया चक्रवर्तीला सकाळी ११ वाजेपर्यंत एनसीबीच्या कार्यालयात जावं लागणार असून तिथे तिची चौकशी होणार आहे. त्यानंतर तिला अटक (Arrest) करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

समन्स बजावताना एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी रियाला दोन पर्याय दिले. तिला चौकसीसाठी सोबत येण्यासाठी सांगण्यात आलंय. स्वतः चौकशीसाठी येणार की आमच्यासोबत असा पर्यायही एनसीबीने रियालादिल्याची माहिती आयआरएस समीर वानखेडे यांनी दिली. त्यानंतर तिने स्वतः हजर होऊ असं सांगितलं आहे.

एनसीबीची टीम आजच रिया चक्रवर्तीची याप्रकरणी चौकशी करणार असून रिया चौकशीसाठी सकाळी साडेदहा वाजता स्वतःहून एनसीबीच्या कार्यालयात पोहोचणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान चौकशीनंतर तिला अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ही बातमी पण वाचा : रियाच्या घरावर अभिनेत्री क्रांती रेडकरचे पती समीर यांनी टाकली एनसीबीची धाड

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER