सीईटी परीक्षेचे सुधारीत वेळापत्रक जाहीर

Revised schedule of CET exam announced.jpg

पुणे : सीईटी (CET) परीक्षांना येत्या तीन ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे.राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे (सीईटी सेल) तंत्रशिक्षण विभाग तसेच उच्चशिक्षण विभागाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर (Revised schedule) करण्यात आले आहे. या सुधारित वेळापत्रक सीईटीसेलने नुकतेच जाहीर केले आहे.

तंत्रशिक्षण विभागाच्या चार सीईटी परीक्षा, तर उच्च शिक्षण विभागाच्या आठ सीईटी परीक्षा येत्या ऑक्टोबर महिन्यात होणार आहेत. या परीक्षांसाठी हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना वेबसाईटवर लिंक देण्यात येईल.

सीईटी परीक्षा सुरक्षा नियमांचे पालन करून घेण्यात येणार आहेत. परीक्षा केंद्रांची माहिती, रिपोर्टिंग टाइम, परीक्षा सुरू होण्याची वेळ आदींबाबतची माहिती हॉल तिकिटावर देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे परीक्षा केंद्रावरील सुरक्षा नियमांची माहितीही हॉल तिकिटावर प्रकाशित करण्यात येईल. परीक्षा केंद्रावर उशिरा पोहोचणार्‍या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही. दरम्यान, एलएलबी (तीन वर्षे) आणि बीएड/ बीएड (ईएलसीटी) या अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा येत्या काही दिवसांत जाहीर करण्यात येतील, असे सांगण्यात आले आहे. परीक्षांबाबत अधिक माहिती वेबसाईटवर उपलब्ध असेल असे सेलतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER