परिस्थितीचा आढावा घेऊन ८ – १० दिवसात लॉकडाऊनबाबत निर्णय : अजित पवार

Ajit Pawar

मुंबई : गेल्या काही दिवसात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने ८ – १० दिवसांत परिस्थितीचा आढावा घेऊन टाळेबंदीबाबत निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. ते म्हणाले की, दिवाळीच्या वेळी बरीच गर्दी होती. गणेश चतुर्थी दरम्यानही अशीच परिस्थिती होती. आम्ही संबंधित विभागांशी बोलत आहोत. ८-१० दिवस परिस्थितीचा आढावा घेऊ आणि नंतर लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल.

दिवाळीच्या वेळी लोकांनी अशी गर्दी केली जणू या गर्दीमुळे कोरोना मरणार आहे, असा टोमणा त्यांनी मारला. राज्य सरकारने एक नियमावली तयार केली आहे, ज्यामध्ये शिक्षकांच्या टेस्टिंगसह इतर नियम आहेत. महापालिका आणि जिल्हा परिषदा निर्णय घेऊ शकतात. परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, नागरिक ‘पॅनिक’ होतील असे मी बोलणार नाही, पाच सहा दिवसांत आढावा घेऊ, असे पवार म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER