व्हिडीओ कॉन्फरन्सिगने आढावा; ‘मातोश्री’त लपण्यासाठी कारण – चंद्रकांत पाटील

Uddhav Thackeray & Chandra Kant Patil

मुंबई : ’जिथे तुम्ही जाऊ शकत नाही तिथे मी पोहोचलो. दुर्गम भागात व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून गेलो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विरोधी पक्षांना म्हणाले. यावर टोमणा मारताना भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले – हे तर ‘मातोश्री’त लपून राहणासाठीचे कारण आहे.

राज्यातील कोरोनाच्या साथीचा आढावा घेण्यासाठी घराबाहेर पडा, अशी टीका विरोधी पक्ष मुख्यमंत्र्यांवर सतत करत होता. आज जनतेशी संवाद करताना मुख्यमंत्र्यांनी या टीकेला उत्तर दिले – जिथे तुम्ही जाऊ शकत नाही तिथे मी पोहोचलो. दुर्गम भागात व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून गेलो. मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर चंद्रकांतदादांनी टोमणा मारला आहे.

उद्धवजी, व्हिडीओ कॉन्फरन्सिगने किती रुग्णालये आणि कोविड सेंटरचे तुम्ही निरीक्षण केले? राज्यातील दोन्ही विरोधी पक्षनेते आपली जबाबदारी समजून राज्यभरातील रुग्णालयांमध्ये प्रवास करत आहेत. रुग्णांची स्थिती जाणून घेत आहेत. प्रशासनाच्या, वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या आणि जनतेच्या मनात विश्वास निर्माण करत आहेत. तुम्ही मातोश्रीमध्ये बसल्या बसल्या किती कोविड सेंटरची परिस्थिती जाणून घेतली यांचे उत्तर राज्याच्या जनतेला द्या. तुमची स्थिती म्हणजे ‘नाचता येईना अंगण वाकडं’ अशी झाली आहे,” अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही मुख्यमंत्र्यावर टीका केली. “करोनापासून बचाव करण्यासाठी सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा विविध पद्धतीने काळजी घेतो आहे. त्यापेक्षा सरकारी पातळीवर आरोग्य यंत्रणेद्वारे प्रभावी उपायोजना कशी करणार हे मुख्यमंत्र्यांनी सांगणे अपेक्षित होते. तसे न करता मुख्यमंत्री उपदेशाचे निरर्थक डोस पाजत बसल्याने सामान्य माणसाची निराशा झाली. मुख्यमंत्र्यांच्या संवादातून राज्याचे अर्थचक्र गतिमान होण्यासाठी भरीव घोषणा होतील अशीही अपेक्षा होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्याबाबतही स्पष्ट दिशादर्शन केले नाही,” असे उपाध्ये म्हणाले.

 बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER