कंगना राणावतच्या वैयक्तिक आयुष्यावर खुलासा; म्हणाली- ‘१६ की उम्र में अंडरवर्ल्ड माफिया की गिरफ्त में थी’

कंगना राणावत (kangana Ranaut) तिच्या प्रत्येक पोस्टबद्दल चर्चेत असते. ती ट्विटरवरील सर्वांत सक्रिय कलाकारांपैकी एक आहे आणि ती स्पष्टपणे बोलते. आता कंगनाने ट्विटमध्ये म्हटले आहे की, जेव्हा ती १५ वर्षांची होती तेव्हा ती घरून पळून गेली होती. एवढेच नव्हे तर तिने मुंबईत मदतीविना घर विकत घेतले.

कंगना तिच्या संघर्षाच्या दिवसांबद्दल सांगते की, त्या दिवसांत तिच्या वडिलांनी तिला कुठलीही मदत केली नाही. वयाच्या १६ व्या वर्षी ती अंडरवर्ल्ड माफियांच्या तावडीत होती. इतके असूनही तिने सतत धडपड केली आणि इंडस्ट्रीमध्ये आपली ओळख निर्माण केली.

कंगनाने ट्विट केले की, ‘मी वयाच्या १५ व्या वर्षी घर सोडले आणि माझ्या वडिलांनी माझ्या संघर्षाच्या दिवसांत मला पाठिंबा देण्यास नकार दिला. मी स्वतःवर अवलंबून होते. वयाच्या १६ व्या वर्षी मला अंडरवर्ल्ड माफियांनी पकडले. वयाच्या २१ व्या वर्षी मी माझ्या आयुष्यातील सर्व शत्रूंचा पाडाव केला आणि राष्ट्रीय पुरस्कार जिंकून एक यशस्वी अभिनेत्री बनले, मुंबईच्या पॉश वांद्रे भागात माझ्या पहिल्या घराचे मालक बनले होते.’

शूटिंगमध्ये व्यस्त आहे कंगना
कंगना सध्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी मध्यप्रदेशात आहे. गेल्या काही दिवसांपासून ती आपल्या स्पाय थ्रिलर चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळापत्रकात व्यस्त आहे. रविवारी ती सतपुडा टायगर रिझर्व येथे पोहचली. ती येथे जंगल सफारीचा आनंद घेताना दिसली.

अलीकडेच कंगना ट्रोलिंगचा बळी ठरली होती. तिने स्वत:ची तुलना हॉलिवूड अभिनेत्री मेरील स्ट्रीप आणि गॅल गॅडोटशी केली. सर्वप्रथम तिने विश्वातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून वर्णन केले. त्यानंतर अ‍ॅक्शनच्या बाबतीत टॉम क्रूझपेक्षा तिची श्रेष्ठता. कंगनाने ट्विट केले होते की, ‘कलाकार म्हणून मी ज्या प्रकारची विविधता सादर करीत आहे, संपूर्ण विश्वात आतापर्यंत अशी अभिनेत्री नाही, माझ्याकडे केवळ मेरिल स्ट्रीपसारखा बहुमुखीपणा नाही तर गॅल गाडोटसारखी कुशल कृती आणि ग्लॅमरसुद्धा आहे.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER