एल्गारबाबतची बोगस कागदपत्रे उघड करा; आंबेडकरांचे पवारांना आवाहन

Sharad Pawar & perakash Ambedkar

पुणे : एल्गार परिषदेचे प्रकरण बनावट असून त्याबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिले होते. ही बनावट कागदपत्रे शरद पवारांनी सार्वजनिक करावी व केंद्रातील मोदी सरकारच्या कारभाराचा पर्दाफाश करावा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले.

आंबेडकर म्हणाले – शरद पवार यांनी एल्गार प्रकरणातील बोगस कागदपत्रे जाहीर करून केंद्र सरकार लोकशाहीची कशी गळचेपी करत आहे हे उघड करावे. यामुळे मोदी सरकारचा आणि तत्कालीन फडणवीस सरकारचा पर्दाफाश होईल. एल्गार परिषदेचे आयोजन सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश पी. बी. सावंत यांनी केले होते. केंद्रात आरएसएस, बीजेपीचे सरकार आल्यानंतर त्यांनी एल्गार परिषदेला बदनाम केले.

एल्गार परिषदेच्या निमित्ताने केंद्राने राजकारण केले असून या प्रकरणाचा तपास चुकीच्या पद्धतीने करण्यात आला. नको असलेले कायदे या ठिकाणी लावण्यात आले आहेत. हे सुरू असतानाच राज्यात देवेंद्र फडणवीसांची सत्ता गेली व उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून एल्गार प्रकरण बोगस असल्याचे सांगितले. एल्गार प्रकरणी तयार करण्यात आलेली कागदपत्रेही बनावट असल्याचे पवारांनी पत्रात म्हटले आहे व या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. पवार वंचित आघाडीच्या या विनंतीला मान देतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER