निवृत्त अधिकाऱ्याला शिवसैनिकांची मारहाण, गुंडाराज थांबवण्याची फडणवीसांची मागणी 

Shiv Sena - Devendra Fadnavis

मुंबई : कांदिवली इथे राहणारे माजी नौदल अधिकारी मनोज शर्मा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर असलेलं व्यंगात्मक कार्टून फॉरवर्ड केलं म्हणून त्यांच्या घरात घुसून शिवसैनिकांकडून मारहाण करण्यात आली. राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली. कंगना आणि शिवसेना (Shiv Sena) यांच्यातील संघर्ष चव्हाट्यावर गेला असतानाच शिवसैनिकांनी एका निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे.

व्हाट्सऍप मेसेज फॉरवर्ड केल्यावरून उत्पन्न झालेल्या वादातून माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. ही घटना निंदनीय असून राज्यासह देशात अनेक वेळा अशा घटना घडलेल्या दिसून येतात. देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय धक्कदायक आणि दुःखद घटना. निवृत्त नौदल अधिकाऱ्याला व्हाट्सऍप मेसेज फॉरवर्डच्या वादातून शारीरिक इजा करण्यात आली. माननीय उद्धव ठाकरे कृपया हा गुंडाराज थांबवावा. या गुंडांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी आम्ही मागणी करतो. अस फडणवीस म्हणाले आहेत.

निवृत्त अधिकारी मदन शर्मा यांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर, भादंवि अनुसार ३२५,१४३, १४७, १४९ अन्वये मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी ६ शिवसैनिकांना अटक केली आहे. भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी देखील आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मारहाणीचा व्हिडिओ शेअर केला आहे. यांनी ट्विट करत ‘साठी उलटलेल्या निवृत्त नौदल अधिकाऱ्याला सहा जण मिळून मारहाण करतात, यांना भामटे नाही तर काय म्हणावं? असा सवाल उपस्थित केला आहे.

आता निवृत्त सैनिक अधिकाऱ्यांवर सुद्धा हल्ला करण्याइतकी खालची पातळी शिवसेनेने गाठली आहे. अशा गुंडांना घाबरून राज्यातील व मुंबईतील जनता गप्प बसेल असे मुख्यमंत्र्यांना व शिवसेनेला वाटत असल्यास ते मोठ्या भ्रमात आहेत. सत्तेचा हा माज जनता येणार्याअ काळात उतरवल्या शिवाय राहणार नाही असेही अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) म्हणाले आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER