एल्गार परिषदेचे अध्यक्ष राहिलेले निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचं निधन

PB Sawant

पुणे : निवृत्त न्यायमूर्ती आणि एल्गार परिषदेचे माजी अध्यक्ष पी बी सावंत (P B Sawant) यांचे निधन झाले. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील पहिली एल्गार परिषद पी बी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती.

पी. बी. सावंत यांचं आज (सोमवार 15 फेब्रुवारी) सकाळी साडेनऊ वाजता निधन झालं. वयाच्या 91 व्या वर्षी राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या सकाळी पुण्यातील बाणेरमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. पी. बी. सावंत यांची अतिशय कडक शिस्तीचे न्यायमूर्ती म्हणून ओळख होती. त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण खटल्यांचा निकाल लागला.

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक, पद्मसिंह पाटील, सुरेश जैन आणि विजयकुमार गावित यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी 1 सप्टेंबर 2003 रोजी स्थापन केलेल्या पी. बी. सावंत कमिशनचे अध्यक्ष होते. त्यांनी आपला अहवाल फेब्रुवारी 2005 मध्ये सादर केला होता, ज्यात नवाब मलिक, पद्मसिंह पाटील आणि सुरेश जैन यांच्यावर आरोप होते. परंतु, त्यांनी विजयकुमार गावित यांना दोषमुक्त केले होते. यामुळे दोन कॅबिनेट मंत्री सुरेश जैन आणि नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा लागला होता. त्याचबरोबर सावंत यांनी एल्गार परिषदेचे अध्यक्षपद भूषवले होते. पी बी सावंत यांच्या पार्थिवावर उद्या मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या जाण्यामुळे वकिली आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER