सेवानिवृत्त न्यायमूर्ती अरुण मिश्रा ‘राष्ट्रीय मानवाधिकार आयोगा’चे नवे अध्यक्ष

Retired Justice Arun Mishra

नवी दिल्ली :- सर्वोच्च न्यायालयातून (Supreme Court) निवृत्त झालेल्या अरुणकुमार मिश्रा (Arun Kumar Mishra) यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे (National Human Rights Commission) नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अरुण मिश्रा यांनी १९७८ मध्ये वकिली सुरू केली. १९९८-९९ मध्ये ते बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. न्यायमूर्ती मिश्रा यांनी आज NHRCचे अध्यक्षपद स्वीकारले.

अरुणकुमार मिश्रा यांची ऑक्टोबर १९९९ मध्ये मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी ७ जुलै २०१४ रोजी सर्वोच्च न्यायालयात पदभार स्वीकारण्यापूर्वी राजस्थान उच्च न्यायालय आणि कोलकाता उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून काम केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शहा, राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या समितीने न्यायमूर्ती मिश्रा यांच्या नावाची शिफारस केली. पीटीआयच्या वृत्तानुसार, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून नवे अध्यक्ष व राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सदस्यांची निवड करण्याच्या प्रक्रियेपासून स्वत:ला मागे घेण्यास सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button