लाॅकडाऊन पुन्हा सुरु करणे, राज्यासह सर्वसामान्य लोकांच्या हिताचे नाही – रोहित पवार

Rohit pawar

मुंबई :- राज्याता कोरोना रुग्णांची (Corona) संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. कोरोणाग्रस्त रूग्णांचा आलेख देशातील इतर राज्यांपेक्षा चढताच आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काही जिल्ह्यात अंशत: तर काही जिल्ह्यात कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाला स्थानिक नागरिक, व्यापारी यांच्याकडून विरोध होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे.

लॉकडाऊनच्या भितीने अर्थव्यवस्थेमधील सर्व घटकांमध्ये संभ्रमाची भावना आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लॉकडाऊन पर्याय नसून लसीकरणाबरोबर लोकांनी कटिबध्दपणे नियमांचे पालन करणं गरजेचंय, लॉकडाऊन पुन्हा सुरू होणं हे राज्यासह सर्वसामान्य लोकांना पूरक ठरणारं नाहीये, असं मला वाटतं, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

रोहित पवार यांनी लॉकडाऊनला विरोध केला नसला तरी लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेतील सर्व घटक म्हणजे व्यापारी, व्यावसायिकांमध्ये संभ्रमाची अवस्था असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे रोहित पवांरानी नागरिकांना लॉकडाऊन टाळायचं असेल तर कोरोनाच्या नियमांचं पालन करायला हवं असं आवाहन रोहित पवार यांनी केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER