नागपुरात ३१ मार्चपर्यंत कडक निर्बंध कायम राहणार : नितीन राऊतांची माहिती

nitin Raut - Maharastra Today

मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. नागपुरात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि होत असलेले मृत्यू याबाबत नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. याच बैठकीनंतर पालकमंत्र्यांनी नागपुरात ३१ मार्चपर्यंत कडक निर्बंध लागू  असल्याची आज घोषणा केली आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर नागपुरात १५ ते २१ मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. यासंबंधी ११ मार्च रोजी पत्रकार परिषद घेऊन नितीन राऊत (Nitin Raut) यांनी घोषणा केली होती.

मात्र, आता ३१ मार्चपर्यंत नागपूरकरांना कडक निर्बंध पाळावे लागणार आहेत. दरम्यान, अशाच प्रकारची मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली होती. नागपुरात पूर्ण लॉकडाऊन न लावता निर्बंध कडक करण्यात यावे, अशी मागणी  देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी बैठकीत केली होती. त्याचा विचार करता पालकमंत्र्यांनी आता नागपुरात निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी सर्वसामान्यांना काही गोष्टींमध्ये सूट मिळण्याची शक्यता आहे.

नागपुरातील विभागीय आयुक्त कार्यालयात ही बैठक आज पार पडली. बैठकीला माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नागपूर जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. नागपुरात कोरोनामुळे होत असलेले मृत्यू आणि वाढत असलेले रुग्ण तसेच खाजगी रुग्णालयांचे रुग्णांना येत असलेले भरमसाट बिल यावरदेखील बैठकीत चर्चा करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER