“रेस्टॉरंट उघडलं असतं” -तितिक्षा तावडे

Titiksha Tawde

प्रत्येक कलाकारांचा अभिनय क्षेत्रात येण्याचा प्रवास हा वेगळा असतो. असंच काहीस अभिनेत्री तितिक्षा तावडे (Titiksha Tawde) चा अभिनेत्री होण्याचा प्रवास आहे. अभिनयाचा हा तिचा प्रवास काही वेगळा होता. जर ती अभिनेत्री नसती तर तिने काय केलं असत ऐकू या तितिक्षा कडून….

अभिनेत्री नसते तर मी रेस्टॉरंट चालू केलं असतं. मी आणि माझ्या बहिणेने आम्ही दोघींनी हॉटेल मॅनेजमेंट केलंय तर आम्ही दोघींनाही कुकिंग, कॅफे कल्चर खूप आवडतं. तर आम्ही रेस्टॉरंट चालू केलं असत. आणि हा व्यवसाय केला असता.

“लाडकी बहिण : अनोखी केमिस्ट्री”

आम्ही दोघी बहिणींपेक्षा जवळच्या मैत्रिणी आहोत. आमचं गिफ्ट शॉप आहे. त्यामुळे आई बाबा दोघे सुद्धा तिकडे कामात असायचे मग अश्या वेळी माझी बहीण माझ्या सोबत असायची. ती लहानपणा पासून आज पर्यंत माझ्या आयुष्यात माझ्या आई बाबांची भूमिका बजावत आहे. आज सुद्धा ती तेवढीच काळजी घेते. आता तिचं लग्न झालंय तरीही आम्ही नेहमी एकमेकींच्या सोबत असतो. ती एकदम आई सारखी वागते. सकाळी शूट ला जाताना माझ्यासाठी डब्बा तयार असतो. रात्री घरी आले की जेवण ती माझ्यासाठी बनवते. तर हे कुठेच बदललं नाही आहे. कधीकधी भावंडांमध्ये भांडण होतात पण आम्ही एका क्षेत्रात असून आम्ही कधीचं कोणत्या गोष्टीसाठी आजवर भांडलो नाही आहोत. आम्ही न बोलता सुद्धा खूप बोलू शकतो.

“कुकिंग स्ट्रेस बस्टर”

कुकिंग माझ्यासाठी स्ट्रेस बस्टर आहे. मला स्वयंपाक करायला खूप आवडतो. वेळ मिळाला की माझा संपूर्ण वेळ कुकिंग साठी देते. फक्त मग त्यावेळी मला माझ्या कामात कोणी लुडबुड केलेली आवडत नाही. शूट मुळे फार कमी वेळ कुकिंग साठी दिला जातो पण कधी माझा उशिरा कॉल टाइम असेल तेंव्हा मी काहीतरी बनवून नेते. घरी खुशबू आणि संग्राम च उशिरा पॅकअप असल्यास मी त्यांच्यासाठी जेवण बनवते.

मला माझ्या या प्रवासाबद्दल फार आश्चर्य वाटतं. जेंव्हा “सरस्वती” मालिका मिळाली तेव्हा मला खरंच वाटत नव्हतं कि मी एका लीड रोल साठी सक्षम आहे. कारण मला काहीच यायचं नाही. त्यात मला एका गावठी मुलीची भूमिका साकारायची होती तर हे कुठेतरी आव्हानात्मक होतं. मला आदल्या रात्री असं फार वाटतं होत कि मला उद्या सेटवरून काढून टाकतील कारण मला एवढ्या लोकांसमोर बोलता येणार नाही. ऑडिशन काय एका बंद खोलीत दिली जाते. पण चारचौघात मला काहीच करता येणार नाही. पण माहित नाही कसं काहीतरी घडलं आणि मी अगदी सहजरित्या अभिनय करायला लागले. मला दिग्दर्शक फार चांगले मिळाले आणि बाकी सहकलाकार फार समजून घेणारे होते त्यामुळे त्यांच्या अनुभवातून मी शिकत होते. मग दुर्गा चा डबल रोल करायला मिळाला. मग त्यात मला दुबई ला जायला मिळालं. कुठेतरी छोटी स्वप्नं बघून हा प्रवास एवढा मोठा होईल हे कधीच वाटलं नव्हतं. एकदम जादुई प्रवास आहे हा. त्या आधी “कन्यादान” मालिकेत अगदी छोटा रोल केला होता. “सरस्वती” मालिका अडीच वर्ष चालली मग त्या नंतर मी थोडा ब्रेक घेऊन फिरायला गेले. तिकडून आल्यावर मला कन्यादानच्या निर्मात्यांचा फोन आला कि आमचा एक शो येतोय तुला करायला आवडेल का? माझ्यासाठी हे फार अद्भुत होत कि ज्यांच्याकडे मी माझ्या करियर ची सुरुवात केली त्यांच्याकडून आज मला मुख्य भूमिकेसाठी फोन येतोय. एकंदरीत माझ्यासाठी हा जादुई प्रवास आहे. इथला प्रत्येक क्षण मी एन्जॉय करतेय आणि जगतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER