अनुभवामुळेच मिळाली जबाबदारी – विनोद तावडे

Vinod Tawde

मुंबई : भाजपा (BJP) नेते आणि माजी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्याकडे पक्षाने हरयाणाचे प्रभारीपद सोपवले आहे. याबाबत ते म्हणालेत – माझा अनुभव पाहून पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली असावी, (Vinod Tawde reaction after elected as Haryana BJP Incharge)

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बिहार निवडणुकीच्यानिमित्ताने राष्ट्रीय राजकारणात ठसा उमटवल्यानंतर भाजपाने महाराष्ट्रातील आणखी काही नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. भाजपाने नुकतीच राज्यनिहाय प्रभारींची नवी यादी जाहीर केली. तावडे याना हरयाणाचे प्रभारी करण्यात आले आहे.

यावर, माझा ‘कमबॅक’ म्हणण्यापेक्षा पक्षाने माझा अनुभव पाहून पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली, असे वाटते. हरयाणात जाट जातीचे वर्चस्व आहे. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष ओ. पी. धनकर यांच्याशी संवादातून पक्षाचे मजबूतीकरण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, अशी प्रतिक्रिया विनोद तावडे यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना दिली.

विनोद तावडे यांनाही गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारण्यात आले होते. ते पक्षावर नाराज असल्याची चर्चा होती. काही दिवसांपूर्वी भाजपाने विनोद तावडेंना राष्ट्रीय कार्यकारिणीत सामावून घेतले होते. तेव्हाच विनोद तावडे यांना भविष्यात राष्ट्रीय राजकारणात सक्रिय करणार असल्याचे संकेत मिळाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER