राणेसाहेबांच्या फोनला प्रतिसाद, उद्धवजी थँक्यू, 7 नगरसेवकांचा स्वीकार करा : नितेश राणे

Nitesh Rane-uddhav thackeray

मुंबई : व्हॅलेन्टाईन डे (Valentine Day) काही दिवसांवर आहे. शिवसेना (Shiv Sena) आमचं जुनं प्रेम आहे. वैभववाडी नगरपंचायतीसाठी शिवसेनेला उमेदवारसुद्धा मिळणार नाही, अशी परिस्थिती शिवसेनेची आहे. शिवसेना हा पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा (Balasaheb Thackeray) आहे. त्यांच्या पक्षाची अशी परिस्थिती होऊ नये म्हणून व्हॅलेन्टाईन डेच्या निमित्ताने आम्ही 7 नगरेसवक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे पाठवत आहोत, असे भाष्य भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करून गेल्यानंतर वैभववाडी येथील भाजपचे 7 नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यावर प्रतिक्रिया देताना राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाष्य केले .

व्हॅलेन्टाईन डे काही दिवसांवर आला आहे. शिवसेना आमचं जुनं प्रेम आहे. जुन्या प्रेमाला विसरायचं नसतं असं सगळे जण म्हणतात. वैभववाडीची परिस्थिती पाहिली तर तिथे उमेदवारसुद्धा मिळणार नाही, अशी शिवसेनेची परिस्थिती आहे. शिवसेना हा पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा आहे. बाळासाहेबांचा आम्ही काल आदर केला. आजही करतो आणि कायम करत राहू. ते आमच्या हृदयात आहेत. मात्र, वैभववाडीत शिवसेनेची परिस्थिती वाईट आहे. बाळासाहेबांच्या पक्षाची अवस्था अशी होऊ नये, अशी आमची प्रमाणिक भावना आहे. म्हणून आमचे 7 नगरसेवक व्हॅलेन्टाईन डेच्या निमित्ताने उद्धवजींकडे पाठवतो आहे,” असे नितेश राणे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी मेडिकल कॉलेज उभारण्यासाठी आवश्यक असलेली सही दिली, त्याचा मोबदला म्हणूनही हे सात नगरसेवक देत असल्याचे ते म्हणाले. मेडिकल कॉलेजसाठी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. त्याला ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. आमच्या मेडिकल कॉलेजसाठी त्यांनी सही केली. त्यांना आम्ही काही दिले तर ते घेणार नाहीत. म्हणून त्यांना मी हे सात नगरसेवक पाठवतो आहे, असे नितेश राणे म्हणाले. तसेच, व्हॅलेन्टाईन डेच्या निमित्ताने उद्धवजींना मनापासून शुभेच्छा देतो, असे म्हणत त्यांनी शिवसेनेवर ताशेरे ओढले आहेत .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER