राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा..!

Rajesh Kshirsagar

कोल्हापूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना (Chhatrapati Shivaji Maharaj) बालपणातच स्वराज्याचे धडे शिकविणाऱ्या रणरागिणी राजामाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त राजमाता तरून मंडळातर्फे के.एम.सी. कॉलेज परिसरातील स्मारकास अभिवादन करण्यात आले. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.

यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले, हिंदू धर्माचे रक्षण करणारे युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रतापशाली संभाजी महाराज ह्या मराठ्यांच्या दोन छत्रपतींना घडविणाऱ्या आदर्श राजमाता जिजाऊ समस्त महाराष्ट्राच्या दैवत आहेत. राजमाता जिजाऊ स्वराज्याची स्पुर्ती, महाशक्ती आणि मातृशक्ती होत्या. राजामातेंचा अखंड महाराष्ट्राने आदर्श जोपासला आहे आणि येणाऱ्या पिढीनेही तो अंगीकारावा, ही काळाची गरज आहे.

यावेळी आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे, उपायुक्त नितीन मोरे संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष किशोर घाटगे, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, राजमाता तरूण मंडळाचे धनाजी आमते, राहुल केर्लेकर, रोहित महाडिक, निलेश आमते, युवराज पाटील, श्रीकांत लाड, विश्वास वगदे, निवास केर्लेकर, प्रतिक नलवडे, रोहन चव्हाण, संतोष लाड आदी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER