‘निसर्गाचा आदर करा हीच बुद्धांची शिकवण’; पंतप्रधान मोदींनी साधला संवाद

buddha purnima

नवी दिल्ली :- “जगासमोर कोरोना हे मोठे आव्हान आहे. आपण सगळे त्याचा सामना करत आहोत. आपल्याला मानवतेसमोर असणाऱ्या इतर आव्हानांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हवामानात होणारे बदल, बदलती जीवनशैली पुढील पिढीसाठी धोकादायक आहे. नद्या, जंगले संकटात आहेत. गौतम बुद्धांनी (Buddha Purnima) आपल्याला निसर्गाचा आदर करण्याची शिकवण दिली आहे.” असे नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी सांगिलते.

वैशाख बौद्ध पोर्णिमेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइन संवाद साधला. ‘मला अभिमान वाटतो की भारत काही अर्थव्यवस्थांपैकी एक आहे, जी शाश्वत विकासाच्या मार्गावर चालत आहे.’ असे ते म्हणाले. खरंतर, कोरोनामुळे संपूर्ण देश संकटात आहे. तसेच, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स, परिचारिका यांचे आभार मोदींनी मानले आहेत. याचबरोबर, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांप्रती शोक त्यांनी व्यक्त केला आहे.

पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले की, “गौतम बुद्ध यांचे जीवन शांतता, एकता आणि सुसंवाद यांच्याशी जुळलेले होते. पण आजही आपल्यातील काही घटक समाजात तिरस्कार, दहशत आणि हिंसा परसरवत आहेत. मानवतेवर विश्वास असणाऱ्या सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यासाठी गौतम बुद्धांनी दाखवलेल्या मार्गावर चॅनल गरजेचे आहे.”

“कोरोना संकटात अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. या महामारीनंतरचे जग आतासारखे अजिबात नसणार. येणाऱ्या काळात कोरोनाची अशीच चर्चा असेल. मात्र, आता आपल्याकडे लस आहे. ते जीव वाचवण्यासाठी आणि कोरोनाचा पराभव करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या संकटानंतर वर्षभर लसीकरण करणे मानवी निर्धार दर्शवते. भारताला आपल्या वैज्ञानिकांचा अभिमान आहे, ज्यांनी लसनिर्मितीसाठी काम केले.” असे कौतुक नरेंद्र मोदींनी केले आहे.

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button