‘शरद पवारांच्या पाठिंब्याचा आदरच, पण…’ नवनीत राणांचे रूपाली चाकणकरांना प्रत्युत्तर

Rupali Chakankar - Navneet Rana - Sharad Pawar - Maharashtra Today

मुंबई : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी लोकसभेत केली होती. यावरून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या (NCP) प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) आणि नवनीत राणा यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहे.

नवनीत राणा आपल्याला जर नैतिकतेचा एवढा पुळका आला असेल तर आधी खासदारकीचा राजीनामा द्या आणि मग महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीच्या गप्पा करा, अशी बोचरी टीका रूपाली चाकणकर यांनी केली होती. आज तुम्ही खासदार म्हणून जी भूमिका संसदेत मांडली आहे ती खासदारकी तुम्हाला राष्ट्रवादीच्या जीवावर मिळालेली आहे म्हणून मांडता आली आहे, अशा शब्दात रूपाली चाकणकर यांनी नवनीत राणा यांचा समाचार घेतला. याला नवनीत राणा यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

मी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) साहेबांनी मला समर्थन दिलं त्याचा मी आदर करते. पण रूपाली चाकणकरांनी मला सांगू नये कुणी राजीनामा द्यावा ते, असे म्हणत नवनीत राणा यांनी चाकणकरांना सुनावले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER