महाराष्ट्रातील ‘हा’ साखर कारखाना राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याच्या कंपनीला भाडेतत्त्वावर देण्याचा ठराव मंजूर

Rohit Pawar - Sugar Factory - Maharastra Today

सोलापूर : करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा बारामती ॲग्रो या रोहित पवार यांच्या कंपनीकडे जाणार असल्याची माहिती समोर आली आहे . रोहित पवार यांची बारामती ॲग्रो कंपनी श्री आदिनाथ कारखाना भाडेतत्त्वावर घेणार आहे.

कारखान्याच्या सर्वसाधारण सभेचं ऑनलाईन आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत ६१२ कारखान्याच्या सदस्यांनी उपस्थिती दर्शवली. या सर्वसाधारण सभेत आदिनाथ साखर कारखाना हा बारामती ॲग्रोला भाडेतत्त्वावर देण्यासाठीचा ठराव मांडण्यात आला. या ठरावावर ९८ टक्के सदस्यांनी होकार दर्शवल्याने अधिकृतरीत्या आता आदिनाथ कारखाना रोहित पवारांकडे जाणार असल्याचं निश्चित झालं आहे.

या ठरावाप्रमाणे आता करमाळ्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीकडे २५ वर्षांच्या भाडेकरारावर देण्यात येणार आहे. शिखर बँकेने संबंधित ठराव मांडला होता. या ठरावावर विचार केल्यानंतर आता रोहित पवारांकडे हा कारखाना जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या कार्यक्रमात कार्यकारी संचालक अरुण बागनवर यांनी आभार व्यक्त केले असून कर्मचारी सभासद तसेच वाहतूकदार यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यात आम्ही समर्थ ठरल्याची माहिती कारखान्याचे संचालक धनंजय डोंगरे यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button