मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हीच पांडुरंग रायकर यांना खरी श्रद्धांजली – नितेश राणे

Pandurang Raikar - Nitesh Rane

मुंबई : एका वृत्तवाहिनीचे पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर (Pandurang Raikar) (४२) यांचे कोरोनामुळे (Corona virus) निधन झाले. महाराष्ट्र शासनाच्या गलथान कारभारामुळे रायकर यांचा जीव गेला, असा आरोप भाजपाचे नेते नितेश राणे यांनी केला. ते म्हणाले की, त्या कोविड केंद्राचे उद्घाटन करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा राजीनामा घ्या, हीच रायकर यांना खरी श्रद्धांजली ठरेल. वेळीच उपचार न मिळाल्यामुळे पांडुरंग यांचा मृत्यू झाला, असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

याबाबत टीका करताना राणे म्हणाले की, ‘पुण्यात tv9 चे पत्रकार रायकर यांचा खून झाला हे सत्य आहे. कारण या महाराष्ट्र शासनाच्या गलथान कारभारामुळे जीव गेला! कोरोना काळात निःस्वार्थी भावनेने सेवा देणारे पत्रकारदेखील सुरक्षित नाहीत! त्या COVID centre चे उद्घाटन करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा घ्या, हीच खरी श्रद्धांजली!’ पांडुरंग रायकर यांच्यामागे पत्नी, दोन मुलं आणि आईवडील आहेत.

ही बातमी पण वाचा:- पुण्यात युवा पत्रकाराचा कोरोनाने मृत्यू, आरोग्य यंत्रणेचे निघाले धिंडवडे

आरोग्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
पांडुरंग रायकर यांना आधी बेड मिळाला नाही आणि नंतर रुग्णवाहिका मिळाली नाही. यामुळे पत्रकार रायकर यांना जीव गमवावा लागला. यावर व्यवस्थेबाबत सर्व स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. पत्रकार पांडुरंग रायकर यांना ऑक्सिजन का मिळाला नाही याची तातडीने चौकशी करण्याचे आदेश राजेश टोपे यांनी दिले आहेत. पुण्यासह इतर जिल्ह्यांत अॅम्बुलन्स तसेच ऑक्सिजन कोणत्याही परिस्थितीत उपलब्ध करा. वेळ पडल्यास भाडेत्त्वावर घ्या, अशा सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. लक्षणविरहित असताना श्रीमंत लोक आयसीयूमध्ये भरती होतात याबाबत जिल्हाधिकारी यांनी अधिक लक्ष दिले पाहिजे, असे टोपे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER