कुलाबा येथे उभारल्या जाणाऱ्या बाळासाहेबांच्या पुतळ्याला स्थानिकांचा विरोध

मुंबई :- बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या पुतळ्याला स्थानिकांचा विरोध आहे. बाळासाहेबांचा पुतळा रहदारी असलेल्या भागात आहे. त्यामुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षेला धोका होऊ शकतो, असा आक्षेप स्थानिकांसह आपली मुंबई संस्थेनं नोंदवला आहे. मात्र पालिकेनं २३ जानेवारीच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) लवकरच एकत्र दिसणार आहेत. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम २३ जानेवारीला दक्षिण मुंबईत होणार आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या कार्यक्रमाचं आमंत्रण राज ठाकरेंना दिलं आहे. या कार्यक्रमाला राज ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्याआधी मे महिन्यात राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्वपक्षीय नेत्यांची मंत्रालयात बैठक बोलावली होती. मात्र त्या बैठकीला उद्धव ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER