मोदींच्या निवडणुकीविरुद्धच्या अपिलावर निकाल राखून ठेवला

tej bahadur-Pm Modi

 नवी दिल्ली: गेल्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांच्या वारणसी मतदारसंघातून लोकसभेवर झालेल्या निवडणुकीस आव्हान देणाºया अपिलावरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने (SC) बुधवारी राखून ठेवला.

सीमा सुरक्षा दलातील (BSF) एक माजी जवान तेज बहादूर याने केलेले हे अपील सरन्यायाधीश न्य. शरद बोबडे, न्या. ए. एस. बोपण्णा व न्या. व्ही. रमासुब्रह्मण्यन यांच्या खंडपीठापुढे सुनावणीस आले. तेज बहादूर याचे वकील अ‍ॅड. प्रदीप कुमार यांनी सुनावणी तहकूब करण्याची किंवा मागे ठेवण्याची वारंवार विनंती केली. त्यास नकार देताना सरन्यायाधीश बोबडे म्हणाले की, पंतप्रधानपद हे देशातील अत्यत महत्वाचे व एकमेवाद्वितीय पद  आहे. त्याच्याशी संबंधित या प्रकरणावरील निकाल नि अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला जाऊ शकत नाही.

तेज बहादूर (Tej Bahadur) बहुजन समाज पार्टीच्या तिकिटावर मोदींच्या विरोधात निवडणूक लढविणार होते. परंतु त्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाºयाने फेटाळला. तो अज चुकीच्या कारणाने फेटाळला गेला त्यामुळे मोदींची निवडणूक वेध नाही, अशी याचिका त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात केली. परंतु त्यांनी गेल्या डिसेंबरमध्ये फेटाळली गेली. त्याविरुद्ध त्यांनी आता हे अपील केले आहे. तेज बहादूर त्या मतदारसंघातील उमेदवार नव्हते किंवा मतदारही नव्हते. त्यामुळे त्यांना विजयी उमेदवाराच्या निवडीविरुद्ध याचिका करण्याचा मुळात अधिकारच नाही, या मुद्द्यावर याचिका फेटाळली गेली होती.

अ‍ॅड. प्रदीप कुमार यांचे म्हणणे असे होते की, तेज बहादूर यांचा निवडणूक अर्ज चुकीच्या पद्धतीने फेटाळण्यात आला व त्याआधी त्यांना आपली बाजू मांडण्याची पुरेशी संधीही देण्यात आली नाही. मोदींच्या वतीने ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी असे निदर्शनास आणले की, हा मुद्दा तेज बहादूर यांना मूळ याचिकेत घेतलेला नव्हता व आता अपिलातही घेतलेला नाही.
तेज बहादूर यांचा उमेदवारी अर्ज फेटाळताना लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या(Representation of Peoples Act) कलम ३३ चा आधार घेण्यात आला होता. हे कलम असे सांगते की, सेवेतून बडतर्फ केलेल्या सरकारी कर्मचाºयास बडतफीर्नंतर पाच वर्षांत निवडणूक लढवायची असेल तर त्यास त्याची बडतर्फी भ्रष्टाचार किंवा सरकारशी बेईमानी या कारणांनी झाली नसल्याचे सक्षम प्राधिकाºयाचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडल्याशिवाय तो अर्ज वैध मानला जाणार नाही.

भारत-पाकिस्तान सीमेवर तैनात असलेल्या ‘बीएसएप’च्या जवानांना निकष्ठ प्रतीचे अन्न दिले जाते, असे सांगत असतानाचा तेज बहादूर यांचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांत व्हायरल झाला होता. त्यानंतर लगेचच २०१७ मध्ये त्यांना ‘बीएसएफ’मधून बडतर्फ केले गेले होते.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER