आमच्या हक्काचे आरक्षण द्या : उदयनराजे

सातारा : दुसऱ्यांचे हिरावून नको तर आमच्या हक्काचे आरक्षण द्या, अशी मागणी भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. काम नसल्याने मराठा समाजातील मुलांची लग्न होत नाहीत, असेही ते म्हणाले. आज नरेंद्र पाटील यांच्या अण्णासाहेब पाटील फाउंडेशनची स्थापना झाली. या कार्यक्रमात भाजपा खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे उपस्थित होते. दोन्ही राजेंनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडली.

मराठा आरक्षणाच्या संदर्भात ते म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. राजकीय अभिनिवेश विसरून मराठा समाजाने एकता दाखवायला हवी.

समाज म्हणून एकत्र येणे आवश्यक : शिवेंद्रराजे

आरक्षणाचा मुद्दा येतो तेव्हा सगळ्या राजकीय चौकटी बाजूला ठेवून समाज म्हणून एकत्र येणे आवश्यक आहे. तरच आरक्षण किंवा लढा आपण जिंकू. राजकीय पुढारी, सामाजिक कार्यकर्ते किंवा समाजातील विचारवंतांनी एकत्र आले पाहिजे, असे शिवेंद्रराजे म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER