भारतीय रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर : ‘जैसे थे’ परिस्थिती

RBI - Reserve Bank Of India

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आज जाहीर केलेल्या द्वैमासिक पतधोरणात खूप सबुरीचे धोरण आखले आहे. ‘जैसे थे’ परिस्थिती (स्टेटसको) ठेवण्याचे निश्चित केले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने खुल्या बाजारात आर्थिक उलाढाल जवळ जवळ ३ लाख कोटी अपेक्षित असल्याने कोविड-१९ चा (Covid-19) प्रादुर्भाव अजूनही असल्याने गेल्या पतधोरणातच रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट कमी केले होते. याचा परिणाम हळू हळू भारतीय अर्थव्यवस्थेवर होत असल्याने तरलता कायम राखण्यासाठी आणि बाजारात तेजी येण्यासाठी  लिलावाद्वारे  २० हजार कोटी बाजारात आणण्याचे निश्चित करीत असल्याचे बँकेने स्पष्ट केले.

यासाठी बँकानी एमएसएफ रेट तसेच रिझर्व्ह बँकेकडून घेतलेल्या अल्प मुदतीवरील कर्जावरील मुख्य दर – रेपो रेट पूर्वीइतकाच म्हणजे ४% तर बँकानी रिझर्व्ह बँकेकडे अल्प मुदतीसाठी ठेवलेल्या ठेवीवरील व्याजदर रिव्हर्स रेपो रेटही पूर्वी इतकाच म्हणजे ३.७५% इतका राखला असला तरी देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाचा दर मात्र ९.५०% एवढा ठेवला आहे. सध्या भारताकडे ५ लाख ४२ हजार २१ अब्ज डॉलर एवढे परकीय चलन असल्याचे तसेच यंदा देशात धनधान्याचे उच्चांकी उत्पादन होणार असल्याचेही शक्तिकांत दास यानी सांगितले.

सध्याच्या पतधोरण समितीमध्ये आशिष गोयल, जयंत वर्मा आणि शशांक भिडे यांची नेमणूक झाल्यामुळे गेले तीन  दिवस पतधोरणसंदर्भात नियमित बैठका झाल्याच्या पार्श्वभूमीवर हे पतधोरण निश्चित झाले. अलीकडे बँकांना रिझर्व्ह बँकेतर्फे रिअल टाईम ग्राॕस सेटलमेंट फॕसिलिटी (RTGS)वर्षाचे ३६५ आठावड्यांचे ७ दिवस २४ तास या पतधोरणातर्फे करून देणार असल्याचेही रिझर्व्ह बँकेच्या शक्तिकांत दास यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER