रिझर्व्ह बँकेचे ‘अच्छे दिन’; सोने आणि परकीय चलन साठ्यात मोठी वाढ

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सुवर्णभांडारात सलग दुसऱ्या आठवड्यात मोठी प्रमाणात भर पडली आहे, अशी माहिती आरबीआयच्या (RBI) ने दिली. परकीय चलन मालमत्तेत (FCA) आणि सोन्याच्या साठ्यात (Gold Reserve) मोठी वाढ झाली आहे. यात सोन्याच्या साठ्यात आठवडाभरात आठ कोटी डॉलर्सची भर पडली. त्यामुळे आरबीआयकडील सोन्याच्या साठ्याचे एकूण मूल्य ३४. ६३ अब्ज डॉलर्स झाले आहे. (RBI Foregin currency e and gold reserve jumps to record break level)

परकीय चलन साठ्यातही वाढ

गेल्या आठवड्यात १९ चा आकडेवारीनुसार चालू आठवड्यात RBI कडील सोन्याच्या साठ्यात २३. ३ कोटी डॉलर्सची भर पडून हा साठा ५८२. २७१ अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. त्यापूर्वीच्या आठवड्यात या साठ्यात १. ७४ अब्ज डॉलर्सची भर पडली होती.

ट्विटरवर RBI सर्वाधिक फॉलोअर्स

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank of India) ट्विटर ‘फॉलोअर्स’ची संख्या रोज वाढते आहे. ती संख्या १० लाखांवर गेली आहे. रिझर्व्ह बँक अशी कामगिरी करणारी जगातील पहिली मध्यवर्ती बँक ठरली आहे. ‘मायक्रोब्लॉगिंग साइट’वर रिझर्व्ह बँकेने १० लाख फॉलोअर्ससह अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह (Federal Reserve) आणि युरोपियन सेंट्रल बँकेला (European Central Bank) मागे टाकले आहे. रिझर्व्ह बँकेच्या ट्विटर हँडलवर उपलब्ध माहितीनुसार, २७ सप्टेंबर २०२० रोजी त्याचे फॉलोअर्स ९. ६६ लाख होते, ते फॉलोअर्स १० लाखांवर गेले आहेत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानंतर ७, ७४००० फॉलोअर्ससह दुसर्‍या क्रमांकावर ‘बँको डी मेक्सिको’ (बँक ऑफ मेक्सिको) आहे. जगातील सर्वात शक्तिशाली मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हचे ट्विटरवर फक्त ६. ६७ लाख फॉलोअर्स आहेत. तर, युरोपियन मध्यवर्ती बँकेच्या फॉलोअर्सची संख्या ५. ९१ लाख आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER