आरक्षण पेटणार! मराठापाठोपाठ धनगर समाजही आक्रमक

dhangar shamajh

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायद्याला अंतरिम स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजाने पुन्हा आंदोलनाचा मार्ग पकडला आहे. त्यापाठोपाठ धनगर समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी एल्गार पुकारणार आहे.

धनगर समाजाच्या आंदोलनाला उद्यापासून (२१ सप्टेंबर) सुरुवात होणार आहे. परभणीत हे आंदोलन केले जाईल. त्यानंतर पुढे प्रत्येक जिल्ह्यात, तालुकापातळीवर आंदोलन करण्यात येईल. महाराष्ट्रातून धनगर समाजाचे नेते आंदोलनात सहभागी होणार आहेत.

धनगर समाजाला महाराष्ट्र सरकारने वेळ द्यावा. यातून मार्ग काढावा; अन्यथा आंदोलन सुरूच राहणार, अशी भूमिका प्रकाश शेंडगे यांनी घेतली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER