आरक्षण : …तर कोरोनाचा विचार न करता रस्त्यावर उतरू; मराठा समाजाचा सरकारला इशारा

Maratha Arakshan

ठाणे : सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर आलेल्या स्थगितीच्या संदर्भात अपयशी ठरलेल्या आघाडी सरकारच्या विरोधात रविवारी सकल मराठा समाजाने संताप व्यक्त करत कोरोनाच्या संकटाचा विचार न करता रस्त्यावर संघर्ष करण्याचा इशारा दिला. ठाण्यातील शासकीय विश्रांतीगृह येथे झालेल्या या बैठकीला जिल्हाभरातून पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित झाले होते.

मराठा आरक्षण प्रश्नाबाबत आलेले अपयश सरकारने चार दिवसात निस्तारले नाही तर समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा देतानाच समाजाने सरकार, शिक्षण मंत्री आणि अधिष्ठाता कुंभकोणी यांचा धिक्कार केला. आरक्षणासाठी गेल्या वेळी एक दिवसाच्या अधिवेशनाचा आग्रह धरणारे उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री आहेत. आता त्यांनी ते अधिवेशन घेतले नाही तर मात्र, मराठा समाज त्यांना माफ करणार नाही, असे मोर्चाचे समन्वयक कैलाश म्हापदी म्हणालेत. मला युक्तीवाद न करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. हा अधिष्ठाता कुंभकोणींचा खुलासा चार कोटी मराठयांशी बेईमान करणारा आहे, असा संताप बैठकीत व्यक्त करण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश येण्याआधीच महाराष्ट्र सरकारच्या शिक्षणमंत्र्यांनी आरक्षित प्रवेश रद्द करण्याचा फतवा जाहीर केला. यावरून इतर समाजांच्या मनात मराठा समाजाविषयी किती पोटदुखी आहे हे लक्षात येते, असे म्हणून बैठकीत शिक्षणमंत्र्यांचा पण निषेध करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER