२०० विशेष रेल्वेगाड्यांचे आरक्षण; तीन दिवसांत साडेसहा लाख तिकिटांची विक्री

Train Tickets

मुंबई : रेल्वे मंत्रालयाच्यावतीने १ जूनपासून नियोजित वेळापत्रकानुसार दररोज १०० गाड्यांच्या  २०० फेऱ्या सुरू करणार आहेत. यासाठी आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर २१ मेपासून तिकीट आरक्षित करणे सुरू झाले. शनिवारपर्यंत ऑनलाईन ६ लाख ५२ हजार ६४४ तिकिटे विकली गेली आहेत. याशिवाय तिकीट खिडकींवरूनदेखील तिकीट विक्री सुरू आहे.

देशातील वेगवेगळ्या भागांतून २०० वातानुकूलित आणि सामान्य गाड्या धावणार आहेत. सीएसएमटी, एलटीटी, मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस येथून देशभरात गाड्या धावणार आहेत.

देशातील मजुरांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी १ मेपासून ‘श्रमिक विशेष ट्रेन’ चालवण्यात येत आहे. १ मेपासून सुरू झालेल्या सध्याच्या श्रमिक विशेष गाड्या आणि १२ मेपासून नवी दिल्लीपासून काही प्रमुख मार्गावर ३० विशेष वातानुकूलित गाड्यांच्या फेऱ्या याव्यतिरिक्त आहेत. आयआरसीटीसीचे संकेतस्थळ किंवा मोबाईल अँपद्वारे या गाड्यांच्या तिकिटांसाठीचे ऑनलाईन आरक्षण सुरू आहे.

रेल्वेने २१ मेपासून तिकीट खिडक्या, सामायिक सेवा केंद्र (सीएससी) आणि तिकीट दलालामार्फत तिकिटांच्या आरक्षणास परवानगी दिली. १४ लाख १३ हजार २७७ प्रवासी क्षमता असलेल्या या गाड्यांसाठी २३ मेच्या दुपारपर्यंत ६ लाख ५२ हजार ६४४ ऑनलाईन तिकिटे आरक्षित करण्यात आली आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER