आरक्षण : अजित पवारांच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चा वाजवणार ढोल

Ajit Pawar - Maratha Kranti Morcha

बारामती : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) आंदोलनात शनिवार, २६ सप्टेंबरला सकाळी ९ ते ११ मराठा क्रांती मोर्चा बारामती (Baramati) येथे अजित पवार (Ajit Pawar) यांच्या सहयोग सोसायटीतील निवासस्थानासमोर ढोल वाजवणार आहे. याआधी ९ ऑगस्ट २०१८ ला मराठा क्रांती मोर्च्याने (Maratha Kranti Morcha) आरक्षणासाठी शरद पवार यांच्या गोविंदबाग निवासस्थानासमोर ढोल वाजवले होते.

‘मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा संघटनांनी पुन्हा राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) योग्य पद्धतीने बाजू न मांडल्याचा आरोप या संघटनांनी केला आहे. ही स्थगिती उठेपर्यंत कोणतीही शासकीय भरती करू नये; अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्च्याने दिला आहे. कोरोनाच्या (Corona) साथीमुळे आंदोलनात सोशल डिस्टंसिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे अत्यावश्यक आहे. समाजावर अन्याय होत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था पाळण्याबरोबरच स्वत:ची व सामाजिक स्वास्थ्याची काळजी घेत आंदोलन करण्यात येणार आहे, असे मराठा क्रांती मोर्च्याने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER