आरक्षणाचा 50 विद्यमान नगरसेवकांना फटका

Kolhapur Municipal Corporation

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेतील आरक्षण सोडतीचा फटका मावळत्या सभागृहातील जवळपास ५० सदस्यांना फटका बसला आहे. हक्काच्या मतदारसंघावर अन्य प्रवर्गाचे आरक्षण पडल्यामुळे अनेकांच्या उमेदवारीचा पत्ता कट झाला तर काही मंडळी अन्य मतदारसंघाचा शोध घेत आहेत.प्रभागाचे आरक्षण बदलल्यामुळे काही प्रभागात पतीऐवजी पत्नीला तर कुठे पत्नीऐवजी पतीराज निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची चिन्हे आहेत. आरक्षणामुळे ठिकठिकाणीच्या लढतीची गणिते बदलली आहेत.

पालकमंत्री यांच्या गावात महिलाराज

शुगरमिल, कसबा बावडा पूर्व बाजू, कसबा बावडा हनुमान तलाव, लक्ष्मी विलास पॅलेस हे चारह प्रभाग सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित बनल्याने विद्यमान नगरसेवक सुभाष बुचडे, श्रावण फडतारे, संदीप नेजदार, अशोक जाधव यांचा पत्ता कट झाला आहे. कसबा बावडा लाइन बाजारप्रभाग, पोलिस लाइन प्रभाग सर्वसाधारण गटासाठी आहेत. यामुळे या दोन्ही मतदारसंघातील गेल्या सभागृहातील नगरसेविका अनुक्रमे माधुरी लाड व स्वाती यवलुजे यांच्यासमोर इच्छुकांचे मोठे आव्हान असणार आहे. या ठिकाणी पुरुष उमेदवाराला संधी मिळण्याची शक्यता आहे.

ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम प्रतिनिधीत्व करत असलेल्या कदमवाडी भोसलेवाडी प्रभागावर अनुसूचित जाती महिला प्रवर्गाचे आरक्षण पडले आहे. तर कदमवाडी प्रभाग सर्वसाधारण गटासाठी आहे. सत्यजित कदम आता कदमवाडी प्रभागातून लढण्याचे संकेत आहेत. तर कदमवाडी प्रभागातून गेली पाच वर्षे स्मिता वैभव माने यांनी प्रतिनिधीत्व केले होते. त्यांचे पती, वैभव आता कदमवाडी भोसलेवाडीमधून लढण्याची शक्यता आहे.सर्किट हाऊस प्रभाग एसटी महिलासाठी आरक्षित झाल्याने नगरसेविका अर्चना पागर यांची संधी हुकली. हक्काचा प्रभाग गमाविल्याने काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख हे सानेगुरुजी प्रभागातून, महेश सावंत हे राजलक्ष्मीनगरमधून तर भूपाल शेटे हे सुभाषनगरमधून चाचपणी करत आहेत.

प्रभाग क्रमांक दहा हा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. या ठिकाणी नगरसेविका सूरमंजिरी लाटकर यांना पुन्हा उमेदवारीची संधी आहे. तर नागाळा पार्क आणि ताराबाई पार्क हे दोन्ही प्रभाग सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने नगरसेवक अर्जुन माने व रत्नेश शिरोळकर यांची अडचण झाली. रमणमळा प्रभाग हा ओबीसी महिलासाठी आरक्षित झाल्यामुळे नगरसेवक राजाराम गायकवाड व व्हिनस कॉर्नर प्रभाग सर्वसाधारण महिलासाठी आरक्षित बनल्याने नगरसेवक राहूल चव्हाण यांची कोंडी झाली. यांच्यावर अन्य प्रभाग शोधण्याची वेळ आली आहे. पक्षप्रतोद दिलीप पोवार प्रतिनिधीत्व करत असलेले कनाननगर प्रभागावर ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाले. यामुळे त्यांना हक्काचा मतदारसंघ गमवावा लागला.

भाजपचे माजी स्थायी समिती सभापती आशिष ढवळेंना धक्का बसला. कारण शिवाजी पार्क प्रभागावर एससी महिला प्रवर्गाचे आरक्षण पडले. सदर बाजार प्रभागात नगरसेविका स्मिता माने यांना पुन्हा लढण्याची संधी आहे. हा प्रभाग सर्वसाधारण खुला झाला आहे. महाडिक वसाहत प्रभाग हा ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने नगरसेविका सीमा कदम यांची कोंडी झाली. मुक्त सैनिक वसाहत प्रभाग एससी महिलासाठी आरक्षित झाल्यामुळे नगरसेवक राजसिंह शेळके यांना हा मतदारसंघ गमवावा लागला. सुरेखा शहा, कमलाकर भोपळे, शोभा कवाळे, संजय मोहिते, उमा इंगळे यांनाही प्रभाग आरक्षण बदलाचा फटका बसला.

गेली पाच वर्षे प्रतिनिधीत्व करत हक्काचा मतदारसंघ तयार केलेल्या अनेक नगरसेवकांच्या प्रभागावर अन्य प्रवर्गाचे आरक्षण पडले. यामुळे पुन्हा त्या प्रभागातून निवडणूक लढविण्याच्या ईच्छेवर पाणी पडले. निवडणूक लढवण्यासाठी काही जण अन्य प्रभागाचा शोध घेत आहेत. मात्र हा मार्ग म्हणावा तितका सोपा नाही. प्रभागाचे आरक्षण बदलल्याने काही जणांचा त्या प्रभागातून पत्ता कट झाला. यामध्ये सुभाष बुचडे, श्रावण फडतारे, संदीप नेजदार, अशोक जाधव, अर्चना पागर, सत्यजित कदम, अर्जुन माने, रत्नेश शिरोळकर, राजाराम गायकवाड, राहूल चव्हाण, दिलीप पोवार, आशिष ढवळे, सीमा कदम, राजसिंह शेळके, सुरेखा शहा, कमलाकर भोपळे, शोभा कवाळे, उमा इंगळे, संजय मोहिते, पूजा नाईकनवरे, जय पटकारे, किरण शिराळे, ईश्वर परमार, सचिन पाटील, संदीप कवाळे, मुरलीधर जाधव, विलास वास्कर, नियाज खान, विजय सुर्यवंशी, संभाजी जाधव, अजित ठाणेकर, शेखर कुसाळे, राहूल माने, प्रताप जाधव, अजित राऊत, महेश सावंत, अश्विनी बारामते, भूपाल शेटे, वहिदा सौदागर, प्रविण केसरकर, लाला भोसले, सुनील पाटील, विजय खाडे, शारंगधर देशमुख, इंदूमती माने, रीना कांबळे, राजू दिंडोर्ले, मेघा पाटील, वनिता देठे, अभिजित चव्हाण.

यांना पुन्हा संधी…

नगरसेविका माधुरी लाड किंवा संजय लाड, स्वाती यवलुजे किंवा सागर यवलुजे, सूरमंजिरी लाटकर, कविता माने किंवा वैभव माने, स्मिता माने किंवा मारुती माने, निलोफर आजरेकर, मेहजबीन सुभेदार किंवा रियाज सुभेदार, सरिता मोरे किंवा नंदकुमार मोरे, श्रीकांत बनछोडे-शिवानंद बनछोडे किंवा उमा बनछोडे, हसिना फरास किंवा आदिल फरास, प्रतिज्ञा निल्ले किंवा महेश उत्तुरे, सविता भालकर किंवा शशिकांत भालकर, छाया पोवार, भाग्यश्री शेटके किंवा उदय शेटके, सुनंदा मोहिते-सुनील मोहिते किंवा सचिन मोहिते, तेजस्विनी इंगवले किंवा रविकिरण इंगवले, माधवी गवंडी किंवा प्रकाश गवंडी, अनुराधा खेडकर किंवा सचिन खेडकर, शोभा बोंद्रे किंवा इंद्रजित बोंद्रे, जयश्री चव्हाण, सविता घोरपडे किंवा राजू घोरपडे, जयश्री जाधव, रुपाराणी निकम किंवा संग्राम निकम, वृषाली कदम किंवा दुर्वास कदम, दीपा मगदूम, मनीषा कुंभार किंवा अविनाश कुंभार, प्रतिक्षा पाटील किंवा धीरज पाटील, मधुकर रामाणे, गीता गुरव.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER