इतर समाजांना विश्वासात घेवूनच मराठा समाजाला आरक्षण : खा. संभाजीराजे

Maratha Reservation - Sambhaji Raje

मुंबई : मराठा आरक्षणाचा प्रश्न हा इतर समाजाला विश्वासात घेवूनच सोडवला जावा, ही माझी सुरुवातीपासूनची भूमीका आजही कायम आहे, असे खा.संभाजीराजे छत्रपती यांनी ओबीसी समाजाच्या नेत्यांच्या बैठकीत स्पष्ट केले. ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी ओबीसी समाजच्या आरक्षणाला धक्का न लागताही मराठा समाजला आरक्षण देणे शक्य असल्याचे यावेळी सांगितले.

खा. संभाजीराजे म्हणाले, बहूजन समाजाला एकत्र करण्यासाठी २००७पासून दौरे केले. त्यावेळीपासून माझी भूमीका स्पष्ट आहे.शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदार आणि आठराबगड जातींना सोबत घेवून स्वराज्य निर्माण केले. छत्रपती शाहू महाराजांनी १९०२मध्ये बहूजन समाजाला आरक्षण दिले. त्यामध्ये बहूजन समाजातील जाती, जमाती ओबीसी आणि मराठा समाजाचा समावेश होता. माझा आजही .सर्व बहूजन समाज एकत्र करण्याचा प्रयत्न आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांची भूमीका रास्त आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे.यातून कसा मार्ग काढायचा याविषयावर चर्चा करण्यासाठीच ओबीसी समाजाचे नेते आज भेटायला आले होते.

मराठा समाजाची स्थिती चिंताजनक आहे. आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज खा. संभाजीराजे यांनी आरक्षण प्रश्नी नेतृत्व करावे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ओबीसी समाजही दोन पावले पुढे-मागे येईल. तुम्हीही या. यातून संविधानदृष्टया यातून मार्ग निघेल असा विश्वास वाटतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER