पंजाबमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता; मुख्यमंत्र्यांविरोधात २५ आमदार दिल्ली दरबारी

Amarinder Singh

चंदीगड : कोरोना संकटाला (Corona Virus) तोंड देत असलेल्या पंजाबमध्ये आता नवं राजकीय संकटदेखील निर्माण झाल्याचं दिसत आहे. पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. मात्र त्या अगोदर पंजाबमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जात आहे. पंजाब काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाल्याची परिस्थिती उद्भवली आहे. काँग्रेसच्या २५ आमदारांनी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग (Amarinder Singh) यांच्याविरोधात बंड पुकारलं असून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे हायकमांडने या २५ आमदार आणि मंत्र्यांना दिल्लीत बोलावले आहे. हे २५ आमदार आणि मंत्री दिल्लीत पोहचले आहेत. या सर्व आमदारांशी काँग्रेसचं एक तीन सदस्यांचं पॅनल चर्चा करणार आहे. त्यांच्यासमोर हे आमदार आणि मंत्री त्यांच्या समस्या मांडणार आहेत.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील झाखड, मंत्री चरणजित चन्नी, सुखजिंदर सिंह रंधवा आदींचा या बंडखोरांमध्ये समावेश आहे. हे सर्व लोक दिल्लीला पोहचले आहेत. निवडणुकीच्या काळात राज्यातील जनतेला काँग्रेसकडून आश्वासने देण्यात आली होती. या आश्वासनांची पूर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे या आमदारांनी मुख्यमंत्र्यांना सवाल करण्यास सुरुवात केली आहे. परिणामी मुख्यमंत्री आणि या आमदारांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. केंद्रीय हायकमांडने जे तीन सदस्यीय पॅनल बनवले आहे, त्याचे नेतृत्व हरीश रावत करत आहेत. त्यांच्याशिवाय मल्लिकार्जुन खरगे आणि जे. पी. अग्रवाल यांचा यामध्ये समावेश आहे. आज हे पॅनल आमदारांशी चर्चा करणार आहे. तसेच, चरणजित सिंह चन्नी, सुखजिंदर सिंह रंधावा हेदेखील या पॅनलशी चर्चा करणार आहेत.

तर, उद्या (मंगळवार) नवज्योत सिंग सिध्दू, परगट सिंह पॅनला भेटतील. विशेष म्हणजे कॅप्टन अमरिंदर यांच्या गोटातील मानले जाणारे मनप्रीत बादल, साधु सिंह हेदेखील दिल्लीत असून पॅनलशी चर्चा करणार आहेत. यानंतर शुक्रवारी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह हे या पॅनलशी चर्चा करण्यासाठी दिल्लीत येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुख्यमंत्रीही खुलासा करणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button