
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना गेल्या दोन महिन्यात तीनवेळा कोरोना झाला. शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या या प्रकारावर संशोधन केले पाहिजे, असा टोमणा भाजपाचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी मारला.
रविवारी जळगाव येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणालेत, संपूर्ण राज्यात कोरोना आहे. पण आमच्या जळगाव जिल्ह्यात वेगळ्याच प्रकाराच कोरोनाचा विषाणू आढळून आला आहे. एका व्यक्तीला तीन-तीन वेळा कोरोना होतो! माजी मंत्री एकनाथ खडसे यांना गेल्या दोन महिन्यात तीनवेळा कोरोनाची लागण झाली आहे. हा कोरोनाचा कोणता प्रकार आहे, याची चौकशी करावी असे मी म्हणणार नाही. पण या कोरोनावर शास्त्रज्ञांनी संशोधन केले पाहिजे,
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत नुकत्याच झालेल्या बैठकीत मी आमच्या जिल्ह्याची अधिक काळजी घेण्याची मागणी केली होती. कोरोनाचा हा नेमका कोणता प्रकार आहे, यासाठी शास्त्रज्ञांना सांगून संशोधन करायला सांगा. त्याचा नायनाट करून तो पुन्हा होणार नाही याची काळजी घ्या, असे मी सांगितले, अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली.
या संदर्भात उल्लेखनीय आहे की, जमीन घोटाळा चौकशीसाठी ईडीने दिलेल्या तारखांच्या आधी एकनाथ खडसे यांना कोरोना झाल्याची माहिती देण्यात आली होती. खडसे यांनी ईडीकडे जाण्यासाठी वेळ वाढवून घेतला होता.
ही बातमी पण वाचा : लव्ह मॅरेज केलं असतं तर आज राज्यात युतीची सत्ता असती – गुलाबराव पाटील
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला