जिल्हापातळीवरील वकिलांकडून ३१ डिसेंबरपर्यंत माहिती मागविली

Supreme Court

नवी दिल्ली :- सर्वोच्च न्यायालयाच्या ई-समितीला सादर करण्यासाठी जिल्हापातळीवरील वकिलांनी आपली माहिती ते ज्या वकील संघटनेचे (Bar Association) सदस्य असतील त्यांच्याकडे सादर करण्याची मुदत बार कौन्सिल ऑफ इंडियाने (Bar Council of India) येत्या ३१ डिसेंबरपर्यंत वाढविली आहे.

जिल्हापातळीवरील वकील संघटनांनी त्यांच्या सर्व सदस्यांची अशी माहिती गोळा करून राज्य बार कौन्सिलकडे द्यायची आहे व राज्य कौन्सिलने ती अ.भा. कौन्सिलकडे पाठवायची आहे. तरी वकिलांनी यासाठी तयार केलेल्या फॉर्ममध्ये माहिती भरून ती थेट बार कौन्सिलकडे न पाठविता आपापल्या संघटनेकडेच द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या ई-समितीने देशभरातील वकिलांशी २२ स्थानिक भाषांमध्ये संवाद साधण्याची व त्यांना केसचे ई-फायलिंग, व्हर्चुुअल सुनावणी इत्यादींचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली आहे. त्या दृष्टीने वकिलांंशी संपर्क करता यावा यासाठी त्यांची व्यक्तिगत माहिती गोळा केली जात आहे. बार कौन्सिल गेल्या जुलैपासून ही माहिती मागवत आहे. परंतु अद्याप सर्व वकिलांनी माहिती न दिल्याने आता पुन्हा मुदत वाढवून  देण्यात आली आहे.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER